22 November 2024 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी फडणवीसांच्या काळात क्लीनचिट | आता कृपाशंकर सिंग भाजपप्रवेशाला सज्ज

Kripashankar Singh

मुंबई, ०६ जुलै | राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. असं असलं तरी कृपाशंकर सिंग यांची उत्तर भारतीयांमध्ये राजकीय पत जवळपास संपली आहे. त्यामुळे लोकसभेच्या वेळी देखील त्यांचा प्रवेश लांबवण्यात आला होता.

बेहिशेबी संपत्ती, बेनामी मालमत्ता, खोटी कागदपत्रे तयार करणे, फसवणूक अशा आरोपांचे गाठोडे शिरावर असलेले काँग्रेसचे एके काळचे वजनदार नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर २०१५ मध्ये आरोपपत्र दाखल झाले होते. त्यानंतर मे २०१८ मध्ये काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांनाही विशेष एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) न्यायालयाने दोषमुक्त केले़ होते. कृपाशंकर सिंह यांच्या पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्रमोहन, सून अंकिता, मुलगी सुनीता व जावई विजय सिंह या सर्वांना एसीबी न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून दोषमुक्त केले़ होते.

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून अडगळीत गेले होते. मात्र, त्यांनी या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी घरोबा निर्माण केला होता. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंह यांच्या घरी गणपतीलाही येत होते. यावरून सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळेच ते भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.

2019मध्ये जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 व 35A हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी सवाल केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याच पक्षात सामील झाले नव्हते. वास्तविक त्यांनी स्वतःच्या राजकीय चालतीच्या काळात अनेक उत्तर भारतीय नेत्यांना आणि समाजाला अंतर्गत कलहातून दुखावलं होतं. त्यानंतर त्यांची उत्तर भारतीय लोकांमध्ये पत घसरली आणि आज ते स्वतः आमदार म्हणून निवडून देखील येतील की नाही याची शास्वती देता येणार नाही. परिणामी काँग्रेसमध्ये देखील त्यांची राजकीय किंमत ढासळली होती. त्यामुळे भाजपने उद्या कितीही म्हटलं तरी कृपाशंकर सिंग यांच्या मुळे भाजपाला नुकसानच होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former congress leader Kripashankar Singh will join BJP tomorrow news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x