22 April 2025 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

राज्यपालांना तो अधिकारच नाही | तर कोर्टात विरोधात निर्णय जाण्याची धास्ती? | फडणवीसांसोबत बैठक

BJP Maharashtra

मुंबई, ०७ जुलै | भारतीय जनता पक्षाच्या १२ निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली. सदर प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. मात्र घटनात्मक सत्य हे आहे की राज्यपालांना तो अधिकारच नाही. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा फडणवीसांच्या निवासस्थानी बैठकीसाठी जमले आहेत. न्यायालयात जाऊन विरोधात निर्णय लागण्याच्या धास्तीने भाजपाच्या अडचणी अजून वाढतील आणि मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.

माफी मागणार?
कोर्टात जायचं नसेल तर अन्य काय पर्याय उरतात यावरही या बैठकीत खल होणार आहे. काही दिवस शांत बसून विधानसभा अध्यक्षांची माफी मागून निलंबन वापस घ्यायला लावायचे की वर्षभर निलंबित राहून जनतेत जाऊन ठाकरे सरकारविरोधा रान पेटवून द्यायचं यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

न्यायालयाला हस्तक्षेपाचा अधिकार नाही:
निलंबित आमदार कोर्टात गेल्यास काय होऊ शकते, यावरही सरोदे यांनी भाष्य केलं. सभागृहाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये दखलअंदाजी करण्याचे न्यायव्यस्थेलाही घटनात्मक अधिकार नाहीत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात जाऊन निलंबित आमदारांना खूप उपयोग होईल असे वाटत नाही. सभागृहाला माफी मागितली व सभागृह अध्यक्ष/सभापती यांनी माफ केल्यास निलंबन मागे घेण्यात येऊ शकते. भाजप आमदारांनी सभागृहात गैरवर्तन केले हे नक्की व स्पष्ट आहे. गैरवर्तन करणाऱ्यांचे वर्तन खपवून घेतले जायला नको, असं केरळच्या एका अशाच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भाष्य महत्वाचे केलेले आहे, असंही सरोदे यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra BJP 12 suspended MLAs reached at Fadnavis’s residence for meeting news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या