Health First | च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा

मुंबई, ०७ जुलै | आपल्यातील अनेक जन आपल्या लहानपणा पासून च्यवनप्राश खात असतील,किंवा आता खायला सुरवात करणार असतील. साधारणपणे २५ आयुर्वेदिक घटक एकत्र करून तयार केले जाणारे हे च्यवनप्राश खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. अनेकदा आपल्या मित्र – मैत्रिणींकडून किंवा वडीलधार्यांकडून सर्दी खोकला झाल्यावर किंवा अशक्तपणा आल्यावर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. याच च्यवनप्राश संबंधित सर्व माहिती या लेखात दिलेली आहे.
अशा या गुणकारी आणि सर्वश्रूत असणार्या च्यवनप्राश खाण्याचे फायदे व तोटे, च्यवनप्राश कसे खावे,च्यवनप्राश खाण्याच्या आधी कोणती काळजी घ्यावी तसेच सर्वोत्तम च्यवनप्राश कोणकोणते आहेत. ही सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात च्यवनप्राश ची सर्व माहिती.
च्यवनप्राश खाण्याचे १० फायदे:
१) रक्त शुद्ध करण्यास च्यवनप्राश मदत करते:
तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी च्यवनप्राश फायदेशीर आहे,दिवसातून १ वेळा च्यवनप्राश खाल्याने तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते व तुमचे शरीर सदृढ रहण्यास मदत होते.
२) हाडांना मजबूत करण्यासाठी च्यवनप्राश गुणकारी:
च्यवनप्राश खाण्याच्या असंख्य फायद्यांपैकी हा देखील एक फायदा आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी च्यवनप्राश चे दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तुमच्या हाडां मधील प्रोटीन व कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. काहींना हाडांच्या संबंधित आजार असतील जसे की संधिवात, अशांना डॉक्टर रोज च्यवनप्राश खाण्याचा सल्ला देतात. आणि त्यांनी च्यवनप्राश दुधासोबत खाल्यास अधिक गुणकारी ठरते.
३) हृदयाच्या मजबुती साठी फायदेशीर:
हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे,आणि अशा या हृदयाचे स्वास्थ जपणे आपल्याला जमलेच पाहिजे. आणि च्यवनप्राश खाल्ल्याने हृदयाच्या रक्त पुरवठा करणार्या नसांना स्वच्छ तर करतेच व मजबूत देखील बनवते. याखेरीस च्यवनप्राश तुमचे हार्ट बीट देखील नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामुळे ज्यांना हृदय विकाराचा त्रास होत असेल अश्याना दिवसातून किमान एकदा च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो.
४) त्वचा चमकदार बनवते:
हवामानातील बदल, प्रदूषण व बदलत्या ऋतूंमुळे देखील तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असतात,जसे की त्वचा कोरडी पडणे, किंवा तरुण पणीच काहींच्या चेहर्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. अशा सर्वांना च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. चवनप्राश खाल्याने तुमच्या त्वचेचे आरोग्य उत्तम राहते व त्वचा मुलायम आणि चमकदार दिसायला लागते. त्यामुळे चेहरा उजळवण्यासाठी इतर क्रीम वापरण्याबरोबरच दररोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश देखील खा तुमचा चेहरा उजळून निघेल.
५) मेंदू साठी देखील च्यवनप्राश फायदेशीर:
च्यवनप्राश खाल्याने स्मरणशक्ती वाढते च्यवनप्राश मध्ये अॅंटी -ओक्सिडेंट असतात जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याच बरोबर काहींना मेंदूचे आजार असतात, अश्यांना देखील च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शारीरिक फायद्यांसोबत मानसिक संतुलन राखण्यास देखील च्यवनप्राश फायदेशीर आहे.
६) रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते:
च्यवनप्राश चा आणखी एक गुणधर्म म्हणजे दैनंदिन च्यवनप्राशच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. कोणत्याही रोगांना किंवा आजारांना विरोध करणारी अशी ही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज किमान एकदा तरी च्यवनप्राश खाणे चांगले. तुमची रोग प्रतिकार शक्ती उत्तम असल्यास साथीच्या आजारांमध्ये तुम्हाला अशा आजारांपासून वाचण्यासाठी निच्छित फायदा होईल.
७) रक्तातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रनात ठेवण्यास गुणकारी:
तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढल्यावर हार्ट अटॅक सारखे परिणाम होतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी असणे फार गरजेचे आहे. आणि हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे काम च्यवनप्राश करते. त्यामुळे नियमित च्यवनप्राश खाल्याने हार्ट अटॅक सारख्या आजरांपासून तुम्ही दूर राहू शकता.
८) श्वसनाच्या आजारांमध्ये च्यवनप्राश उपयोगी:
सहसा काही म्हातार्या माणसांमध्ये श्वसनाचे त्रास असतात, आणि अशा सर्वांना डॉक्टर देखील दिवसातून किमान एक चमचा च्यवनप्राश कोमट पाण्यासोबत घेण्याचा सल्ला देतात. परंतु ज्यांना श्वसनाचे विकार आहेत किंवा त्रास होत असतो अशांनी दूध व दही खाणे टाळावे.
९) वजन कमी करण्यासाठी देखील च्यवनप्राश चा वापर:
ज्यांचे वजन वाढले आहे परंतु त्यांना ते नियंत्रणात आणायचे आहे अश्यांनी देखील रोज च्यवनप्राश चे सेवण केले पाहिजे. च्यवनप्राश च्या सेवनासोबतच नियमित व्यायाम आणि आहाराच्या बाबतीतील योग्य डायट प्लान अंगिकारल्यास तुमचे वजन नक्कीच लवकर कमी होईल.
१०) पचन प्रक्रिया सुधारते:
काहींना पचनाचे आजार असतात, अशा सर्वांसाठी च्यवनप्राश मध्ये असलेले तेजपत्ता व दालचीनी मुळे त्यांना पचनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नियमित च्यवनप्राश खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते व अन्न व्यवस्थित पचून तुमची पचनशक्ती वाढते. दिवसातून सकाळी किमान एकदा च्यवनप्राश खाल्ल्याने तुमची पचनाच्या विकारांपासून मुक्ती होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
News Title: Healthy Chyawanprash benefits in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON