22 November 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Alert | राज्यात आजपासून मुसळधार | पुढील 4 दिवस याठिकाणी पाऊस

Rain Update

मुंबई ०८ जुलै : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तर बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तर विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात 9 जुलैपासून पाऊस होणार होईल. तसेच 11 जुलैला अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यात कुठे कधी पाऊस?

8 जुलै : पुणे, नगर, नाशिक, जळगावात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही पावसाची हजेरी.

9 जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

10 जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

10 जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा.

10 जुलै : पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता

11 जुलै : मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस

11 जुलै : विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Weather Alert on rains in the Maharashtra from today news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x