13 November 2024 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

रस्त्यावर वाहतूक पोलिसाशी असभ्य भाषेत हिरोगिरी | खाक्या दाखवताच ढसाढसा रडला

Crime Patrol

मीरा रोड, ०९ जुलै | मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत दाम्पत्याने त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला. नयानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली. मात्र पोलिसी खाक्या दिसताच तरुणाची अक्कल ठिकाणावर आली, असं म्हणावं लागेल. कारण, पुन्हा असं वर्तन न करण्याची हमी देत तरुणाने पोलिसांची माफी मागितली. आधी अरेरावी आणि नंतर माफीनामा मागतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

मीरा भाईंदर रस्त्यावरील नो पार्किंगमधील जागेत उभ्या केलेल्या चारचाकी गाडीला वाहतूक पोलिसांनी काल दुपारी जॅमर लावला होता. त्यामुळे संतापलेल्या कार मालक तरुणाने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली “आपकी वर्दी निकालो यही मारता हू, तेरे को बिच मे से चिर देता हू” अशा शब्दात त्याने पोलिसांवर आवाज चढवल्याचं पाहायला मिळालं. तरुणासोबत असलेल्या त्याच्या पत्नीनेही पोलिसांना धमकावल्याचं समोर आलं आहे.

रस्त्यावर हिरोगी आणि खाक्या दाखवताच नरमला:
पोलीस कॉन्स्टेबलने या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची संपूर्ण हिरोगिरी उतरली आणि तो ढसाढसा रडायला लागला. आरोपी तरुणाचं नाव अरुण रतन सिंह आणि त्याची पत्नीचं नाव मीना अरुण सिंह आहे. हे दोघे पती पत्नी मीरा रोडच्या रामदेव पार्कमध्ये राहतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x