24 November 2024 6:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

विमा कंपनीने तुमचा क्लेम फेटाळल्यास काय करावे? | जाणून घ्या प्रक्रिया

Insurance Company reject claim

मुंबई, ०९ जुलै | अनेकांना आरोग्य संबंधित समस्येमुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत, मग अशा प्रकारे तक्रार करू शकता. जर तुम्हीही एखाद्या विमा कंपनीवर नाराज असाल किंवा तुम्हाला विमा कंपनीची तक्रार करायची असेल, तर तुम्हीही हे करु शकता. यासाठी तुम्ही IRDA कडे विमा कंपन्यांची तक्रार करु शकता.

प्रक्रिया काय?
* यासाठी तुम्हाला सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवावी लागेल. या तक्रारीवर तुम्हाला 15 दिवसात योग्य उत्तर न मिळाल्या तुम्ही याविरोधात IRDA कडे धाव घेऊ शकता.
* IRDA कडे तक्रार नोंदवण्यासाठी [email protected] या ईमेल आयडीवर तक्रार दाखल करु शकता.
* तसेच तुम्ही IRDA च्या टोल फ्री क्रमांकावर 155255 किंवा 1800 4254 732 वर देखील तक्रार करू शकता.
* जर तुम्ही ही तक्रार केल्यानंतर त्यावर काहीही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार करू शकता.

विमा लोकपाल म्हणजे काय?
विमा लोकपाल हा विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात समन्वय साधतो. तसेच हा व्यक्ती कागदाच्या आधारे क्लेमची रक्कम देखील निश्चित करू शकतो. जर इन्‍शुअर व्यक्ती क्लेम रकमेस सहमत असेल तर ऑर्डर पास केली जाते. यानंतर कंपनीला 15 दिवसांच्या आत त्याचे पालन करावे लागते. यानंतर मग लोकपाल निर्णय सुनावतो, जो विमा कंपनीला स्विकारावा लागतो.

या व्यतिरिक्त तुम्ही ग्राहक आयोगात कंपनीविरोधात तक्रार दाखल करु शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा मिळते. मात्र त्यानंतर तुम्हाला ग्राहक न्यायालयात हजर व्हावे लागेल. तसेच यानंतर तुम्हाला न्याय मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मात्र यात दावा करणार्‍या लोकांनी विमा कंपनीच्या सर्व अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण जर यानंतर कंपनीने तुमचा दावा फेटाळला तरी तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Insurance Company reject your claim know how to file complaint  To IRDA Check All details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#IRDA(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x