22 November 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

खरीप पिक विमा २०२१ साठी ऑनलाईन अर्ज असा करा | वाचा संपूर्ण माहिती आणि त्वरा करा

Pik Vima Yojana 2021

मुंबई , १० जुलै | पिक विमा ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे. मित्रांनो पिक विमा भरत असतांना कधी कधी चूक होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पिक विमा काळजीपूर्वक भरावा. पिक विमा अर्ज भरत असतांना अनेक प्रश्न निर्माण होतात. पिक विमा अर्ज संदर्भात जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. खालील बाबी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

पिक विमा अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर भरावा:
* ऑनलाईन पिक विमा अर्जामध्ये बँकेची माहिती कशी टाकावी
* शेतकऱ्यांची माहिती कशी टाकावी
* वारसदारांची माहिती कशी टाकावी
* विविध पिके कसे एड करावे
* शेतकऱ्यांना स्वतः हा अर्ज भरण्याची इच्छा असेल तर ते कशा पद्धतीने स्वतः पिक विमा भरू शकतात.
* कोणकोणते कागदपत्रे अपलोड करावे लागतात.
* ऑनलाईन पिक विमा अर्ज भरतांना सातबारा कोणत्या शेतकऱ्यांना सातबारा अपलोड करावा लागतो व कोणत्या शेतकऱ्यांना सातबारा उतारा अपलोड करण्याची गरज नाही.
* पिक विमा अर्जासाठी पेमेंट कसे करावे. वालेटमध्ये पैसे नसतील तर पैसे कसे ॲड करावे.
* पीक प्रमाणपत्र महणजेच पिक पेरा कसा भरावा.
* पिक पेरा अपलोड कसा करावा.
* अर्ज सादर कसा करावा
* अर्जाची प्रिंट कशी काढावी
* अर्जाची स्थिती कशी बघावी.

पिक विमा ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खालील बाबी लक्षात ठेवा:
* तुमच्या सीएससी वॉलेटमध्ये किंवा बँक खात्यामध्ये पुरेसे पैसे असल्याची खात्री करा.
* बँक पासबुक स्कॅन कॉपी तयार ठेवा.
* आधार कार्ड स्कॅन करून ठेवा.
* ७ १२ स्कॅन केलेली कॉपी रेडी ठेवा.
* पिक पेरा स्कॅन कॉपी सुद्धा तयार ठेवा.
* तुमच्या जिल्ह्यातील कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही विमा भरू शकता याची देखील माहिती असू द्या.

पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकांसाठी पिक विमा स्वीकारला जाणार आहे.

तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती पिक विमा कंपनी नेमून दिलेली आहे त्या विषयी जाणून घेण्यासाठी खालील पिक विमा कंपनी यादी या बटनावर क्लिक करून हि pdf फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.

पीक विमा कंपनी यादी येथे क्लिक करून वाचा किंवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करा आणि वाचा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/PMFBY-Press-Note-Kharif-2021-30.06.2021.pdf

ऑनलाईन पिक विमा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपात्रांविषयी:

बँक पासबुक:
ऑनलाईन पिक विमा भरतांना शेतकऱ्यांचे बँक पासबुक अपलोड करावे लागणार आहे. अर्जाच्या सुरुवातीला सादर केलेल्या बँक तपशिलासोबत बँकेच्या पासबुकातील माहिती तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. पिक विमा ऑनलाईन अर्ज भरतांना बँक तपशिलामध्ये टाईप केलेली माहिती व बँक पासबुकातील माहितीमध्ये तफावत आडळल्यास पिक विमा नुकसानीचा दावा करण्यास अडचण येण्याची शक्यता असते.

आधार कार्ड:
शेतकऱ्यांच्या आधारकार्डची छायांकित प्रत जोडणे आवशयक आहे. बँक पासबुक अपलोड करतांनाच या हे आधार कार्ड त्यामध्ये समाविष्ठ करावे लागणार आहे. कारण आधार कार्ड अपलोड करण्यासाठी वेगळा असा पर्याय दिलेला नाही आहे.

सातबारा उतारा:
पिक विमा ऑनलाईन अर्ज भरतांना जर शेतकऱ्यांची वैयक्तिक जमीन असेल तर सातबारा अपलोड करण्याची गरज नाही पण जर शेतकऱ्यांची जमीन सामाईक क्षेत्र असेल तर मात्र सातबारा उतारा अपलोड करणे आवशयक आहे. सातबारा मिळविण्याचे तीन पर्याय उपलब्ध आहेत.

* पहिला पर्याय आहे तलाठ्याकडे जावून सातबारा मिळविणे.
* दुसरा पर्याय आहे डिजिटल क्यू आर कोड सातबारा डाउनलोड करणे.
* तिसरा पर्याय आहे महा भूमी अभिलेख या वेबसाईटवरील View only – Not for legal purpose हा सातबारा डाउनलोड करणे.

बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल कि सातबारा उतारा नेमका कोणता अपलोड करावा. तर पिक विमा प्रशिक्षणामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार वरील तिन्ही पैकी एक कोणताही सातबारा तुम्ही अपलोड करू शकता फक्त अट एकच आहे कि शेतकऱ्यांची भरलेली माहिती व सातबारा वरील माहिती अचूक जुळली पाहिजे व त्यातील माहिती स्पष्टपणे समजली पाहिजे.

पिक पेरा प्रमाणपत्र:
मित्रांनो पिक पेरा प्रमाणपत्र देखील ऑनलाईन अर्ज भरतांना अपलोड करायचे आहे. पिक पेरा प्रमाणपत्रामध्ये खालील माहित भरावी.

शेतकऱ्यांचे पूर्ण नाव लिहावे:
* शेतकरी बांधवांचे नाव, गाव जिल्हा त्याचप्रमाणे संपूर्ण पत्ता अचूक टाकावा.
* शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर अचूकपणे लिहावा.
* शेतकरी बांधवांची शेती ज्या गावात आहे याविषयी माहिती लिहावी.
* शेत जमिनीमध्ये पेरणी केलेल्या पिकांची माहिती लिहावी.
* ज्या दिवशी पेरणी झाली असेल त्या दिवसाचा दिनांक लिहावा.
* जेवढ्या क्षेत्रामध्ये पेरणी केली असेल त्या संबधीत माहिती हेक्टर व आर या परिमाणामध्ये टाकावी.
* खालील लिंकला टच करून पिक पेरा डाउनलोड करा.

येथे क्लिक करा आणि पिक पेरा डाउनलोड करा. किंवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करून डाउनलोड करा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/pik-pera-government..pdf

पिक पेरा प्रमाणपत्रामध्ये योग्य ती माहिती लिहा:
पिकांचा विमा भरण्पियासाठी क पेरा नमुना तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. पिक पेरा pdf डाउनलोड करण्यासाठी व पिक पेरा प्रमाणपत्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. हे पिक पेरा व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. शेतकरी बांधवांनी पिक पेरा प्रमाणपत्रामध्ये अचूक व सत्य माहिती द्यावी. नसलेल्या क्षेत्राचा जास्त पिक विमा काढण्यासाठी पिक पेरा प्रमाणपत्रामध्ये जर खोटी माहिती दिली तर शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाही होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिक पेरा प्रमाण पत्रामध्ये सत्य माहिती लिहावी. खालील बटनावर क्लिक करा आणि पिक पेरा प्रमाणपत्र व पिक पेरा संबधी अधिक माहिती जाणून घ्या.

ऑनलाईन पिक विमा सादर करण्याच्या दोन पद्धती:
कामाच्या घाईमुळे किंवा वेळ न मिळाल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला जर सी.एस.सी. सेंटर किंवा बँकेत जायला वेळ मिळाला नाही तर तो शेतकरी स्वतः न जाता हा अर्ज स्वतःच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून सादर करू करू शकतात. शेतकऱ्याने स्वतः ऑनलाईन पिक विमा सादर करण्याची पद्धत व सी.एस.सी. लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून अर्ज करण्याची पद्धत अशा दोन्ही पद्धती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

शेतकरी स्वतः सादर करू शकतात त्यांचा पिक विमा अर्ज:
शेतकरी स्वतः त्यांच्या शेतातील पिकांच्या विम्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. त्यासाठी खालील दिलेली पद्धतीचा अवलंब करावा लागेल.

* तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY ) हा कीवर्ड टाईप करा किंवा डायरेक्ट पिक विमा वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. OR Copy Link: https://pmfby.gov.in/
* वरील कीवर्ड टाईप करताच तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) हि वेबसाईट दिसेल.
* PMFBY वेबसाईटवरील दिसत असलेल्या farmer corner या बटनावर क्लिक करा.
* Login for farmer या बटनावर क्लिक करा.
* मोबाईल नंबर व कॅपचा कोड टाकून Request for OTP या बटनावर क्लिक करा.
* OTP टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
* Submit या बटनावर क्लिक करताच तुम्ही लॉग इन व्हाल. लॉग इन झाल्यावर पिक विमा अर्ज भरण्यास सुरुवात करा.

जाणून घ्या सी एस सी सेंटरवर कसा भरावा हा ऑनलाईन पिक विमा अर्ज:
तुमच्याकडे सी.एस.सी. सेंटर असेल तर तुम्ही तुमच्या डिजिटल सेवा पोर्टलचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून विविध शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज भरू शकतात. हे अर्ज भरण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

* डिजिटल सेवा डॉट सी.एस.सी.डॉट जीओव्ही डॉट इन हि वेबसाईट शोधा किंवा डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. Or Copy Link: https://digitalseva.csc.gov.in/
* जसे हि डिजिटल सेवा पोर्टल ओपन होईल त्यावेळी लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
* लॉगीन केल्यावर सर्च बारमध्ये PMFBY हा कीवर्ड टाईप करा त्यानंतर तुमच्या स्कींवर प्रधान मंत्री फसल बिमा योजनेची लिंक असलेला पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. किंवा दिसत नसेल तर गुगलमध्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana हा कीवर्ड सर्च करा आणि एंटर करा.
* Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) हि वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवरील CSC login या पर्यायावर क्लिक करा.
* तुमचा सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

पिक विमा अर्ज करण्यासाठी लॉगीन केल्यानंतर अर्ज सादर करण्यासाठी पुढील पद्धत:
* लॉगीन करताच Select season या सदरामध्ये State या रकान्यामध्ये महाराष्ट्र निवडा
* 2021 Kharif Pradhan Mantri Fasal Bima Yojana या पर्यायावर क्लिक करा.
* Home, Application व Download असे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी Application या पर्यायावर क्लिक करा.
* Application या बटनावर क्लिक करताच CSC Application या पर्यायाच्या खाली Application form हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
* Application form या पर्यायावर क्लिक करताच या ठिकाणी पिक विमा अर्ज भरण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

ऑनलाईन पिक विमा अर्ज भरण्यास प्रत्यक्ष सुरुवात करा:
* Application form या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पिक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करावी लागणार आहे.
* सुरुवातीला बँकेचे तपशील टाका यामध्ये बँकेचे नाव, शाखेचे नाव, खाते प्रकार, खते क्रमांक, इत्यादी माहिती टाका.
* वरील प्रमाणे बँकेचे सर्व तपशील टाकल्यानंतर Chek Bank Details and Continue या बटनावर क्लिक करा.

शेतकऱ्याविषयी माहिती भरा:
* पासबुकवर जे नाव आहे ते अचूक दिलेल्या चौकटीत टाईप करा.
* आधार कार्डवरील नाव सुद्धा अचूकपणे टाईप करा.
* शेतकऱ्यांचा आधार क्रमांक दिलेल्या चौकटीत टाका आणि त्यापुढील verify या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
* Relation टाईपमध्ये (S/O) सन ऑफ म्हणजेच वडिलांचे नाव टाका, (W/O) पत्नीचे नाव टाका, (D/O) मुलीचे नाव टाका, (C/O) केअर ऑफ जे तुमचे पालन करताहेत त्यांचे नाव टाका. जो पर्याय तुम्हाला लागू होत असेल तो या ठिकाणी टाका.
* मोबाईल नंबर टाका, वय टाका, लिंग, caste category टाका. Farmer category मध्ये तीन पर्याय दिसतील १) woner म्हणजे मालक २) Tenent – भाड्याने जमीन करणारा ज्याला आपण ठेक्याने जमीन देणे सुद्धा म्हणू शकतो ३) share croer – म्हणजेच मालक आणि इतर व्यक्ती मिळून शेती करत आहेत ज्याला बटईणे शेती करणे सुद्धा म्हणतात. या तीन पर्यायापैकी जो पर्याय शेतकऱ्याला लागू होत असेल तो पर्याय या ठिकाणी निवडावा.

शेतकऱ्यांचा पत्ता:
* शेतकऱ्यांचा संपूर्ण पत्ता टाकावा जसे कि स्टेट या रकान्यामध्ये महाराष्ट्र हा पर्याय निवडा.
* District या चौकटीमध्ये शेतकऱ्याचा जिल्हा निवडा.
* Sub District मध्ये शेतकऱ्याचा तालुका निवडावा.
* Residential village / town मध्ये शेतकऱ्याची ग्रामपंचायत किंवा गाव निवडावे.

Nominee details ( वारसदाराचे तपशील) अनिवार्य नाही:
* वारसदाराचे संपूर्ण नाव टाकावे
* वार वय
* वारसदाराचे अर्जदाराशी असलेले नाते
* वारसदराचा संपूर्ण पत्ता टाकावा.
* हि सर्व माहिती टाकल्यानंतर Save and Continue या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.

पिकांचे तपशील भरा ( Crop Details ):
* स्टेट मध्ये महाराष्ट्र निवडा
* District मध्ये शेतकऱ्याचा जिल्हा निवडा.
* तालुक्याच्या चौकटीमध्ये शेतकऱ्याचा तालुका निवडावा.
* शेतकऱ्याच्या गावासाठी असलेले revenue सर्कल निवडा
* शेतकऱ्यांची ग्रामपंचायत आणि गाव निवडा
* Mix Crop असेल तर चौकटीमध्ये टिक करा नसेल तर करू नका.
* सिलेक्ट पर्यायावर क्लिक करून पिकांचे नाव निवडा
* ज्या पिकाचा पिक विमा काढायचा आहे त्या पिक कच्या समोर दिलेल्या sowing date पिक पेरणीची तारीख सिलेक्ट करा.
* सर्वे नंबर आणि खाता नंबर टाका आणि verify या बटनावर क्लिक करा.
* जसे हि तुम्ही verify या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या जमिनीचे सर्व तपशील तुम्हाला दिसेल ते वाचून घ्या आणि submit या बटनावर क्लिक करा.
* Insured Area मध्ये किती क्षेत्राचा विमा काढायचा आहे ते क्षेत्र टाका.
* जसे हि तुम्ही क्षेत्र टाकाल त्यावेळी Sum Insured या रकान्यामध्ये किती पिक विमा संरक्षण मिळणार आहे त्या संदर्भातील रक्कम या ठिकाणी दिसेल.
* Premium rate, Farmer Share आणि Total premium संदर्भात या ठिकाणी माहिती दिसेल.
* Add crop or survey number for insurance या बटनावर क्लिक करून एक एक करत पिक एड करत चला.

अर्जदाराचे कागदपत्रे उपलोड करा:
* शेतकरी बांधवांचे पासबुक अपलोड करा.
* सामाईक क्षेत्र असेल तर शेतकरी सातबारा अपलोड करावा.
* पिक पेरा अपलोड करावा.
* Tenant लागू असेल तर अपलोड करा.
* सर्व कागदपत्रे उपलोड केल्यानंतर preview या बटनावर क्लिक करा.
* preview या बटनावर क्लिक करून सर्व माहिती वाचल्यानंतर Make Payment या बटनावर क्लिक करा.

पेमेंट करण्याची पद्धत:
* Make Payment या बटनावर क्लिक करा.
* पेमेंट करण्यासाठी wallet.csccloud.in हि वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी सी.एस.सी.आयडीसाठी असलेला पासवर्ड आणि पिन wallet पिन टाकून पेमेंट करायचे आहे.
* जसेही पेमेंट यशस्वी होईल त्यानंतर प्रिंट हे बटन दिसेल तयार क्लिक करताच शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांचा पिक विमा पावती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हे प्रिंट करून घ्या.

खालील पर्यायाविषयी थोडक्यात जाणून घेवूयात:
Online application 2) Paid Applications 3) Unpaid Applications 4) Reverted Applications 5) Approved Applications 5) Rejected paid Applications असे पर्याय csc dashboard ला दिसतील. या पर्यायांविषयी या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती जाणून घेवूयात.

Online application:
या पर्यायावर क्लिक करून तुम्ही शेतकरी बांधवांच्या पिकांचा पिक विमा भरू शकता

Paid Applications:
VLE यांनी ज्या शेतकरी बांधवांचे अर्ज पूर्णपणे यशस्वीरित्या भरलेले आहेत त्यांचे अर्ज Paid Applicationsया सदरामध्ये दिसतात.

Unpaid Applications:
शेतकऱ्यांचा पिक विमा अर्ज सादर केलेला आहे परंतु पेमेंट करणे बाकी आहे असे अर्ज Unpaid Applicationsया सदरामध्ये दिसतात.

Reverted Applications:
सर्व माहिती भरून अर्ज सादर केलेला आहे कागदपत्रांच्या कमतरतेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अर्ज स्वीकारला गेलेला नाही त्यामुये अर्ज परत आलेला आहे असे अर्ज या सदरामध्ये दिसतात.

Rejected paid Applications:
जे अर्ज बाद झालेले आहेत ते अर्ज या सदरामध्ये दिसतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pik Vima Yojana 2021 online application process in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x