18 April 2025 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

महागाईच्या रौद्रावतारामुळे सामान्य लोकांचे खिसे खाली | अबकी बार मोदी सरकार, भाजप को वोट दे

petrol diesel price

मुंबई, ११ जुलै | २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तत्कालीन युपीए सरकार विरोधात प्रचारात महागाई तसेच पेट्रोल डिझेलची झालेली भाव वाढ हेच प्रमुख मुद्दे केले होते. याच मुद्यावरून ‘अबकी बार मोदी सरकार’ ‘भाजप को वोट दे’ अशी जोरदार जाहिरातबाजी केली होती. मात्र त्याच मुद्यांवरून देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी, पेट्रोलियम मंत्री आणि अर्थमंत्री चकार शब्द देखील काढताना दिसत नाहीत.

सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने मुंबई, ठाणे, कोकणासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे सर्व भाग महागाईच्या वणव्यात होरपळले आहेत. भाज्या, फळे, डाळी आणि दुधाचे दर वधारल्याने सामान्यांच्या घरखर्चात वाढ झाली आहे. मालवाहतूकदारांनी भाडेवाढ केल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

इंधनाचे वाढते दर आणि टाळेबंदीतील निर्बंधांचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होताना दिसत आहे. जीवनावश्यक वस्तूंची आवक स्थिर असतानाही किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. डाळींच्या दरांतही किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी इंधन दरवाढीचे कारण पुढे करत किरकोळ बाजारात ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू आहे.

वाहतूक खर्च वाढल्याने घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी किरकोळ विक्रेते इंधन दरवाढ आणि टाळेबंदीच्या नावाखाली भाज्यांची दुप्पट दराने विक्री करत आहेत. करोनाची संभाव्य तिसरी लाट आणि करोनाच्या उत्परिवर्तित प्रकाराच्या भीतीमुळे राज्यात २८ जूनपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने तसेच बाजारपेठा सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार विक्रीचा कालावधी कमी झाल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी वस्तूंच्या किमतींत आणखी वाढ केल्याचे आढळते.

मुंबई महानगर क्षेत्रात किरकोळ बाजारात भेंडी (६०-८० रुपये किलो), कांदा (३५ ते ४०), फ्लावर (४० ते ६० रुपये), गवार (८० ते १०० रुपये), कारली (६० ते ८० रुपये) अशा प्रमुख भाज्यांची विक्री अवाच्या सवा दराने होत आहे. घाऊक बाजारात २२ रुपये प्रति किलोने विकला जाणारा दुधी भोपळा किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपयांनी विकला जात आहे. घाऊक बाजारात ११० रुपये प्रति किलोने विकली जाणारी फरसबी किरकोळ बाजारात १२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारात १२० रुपये किलो असलेला मटार किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपयांनी विकला जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Inflation at highest level in India after continues hike in Petrol Diesel price news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Inflation(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या