21 November 2024 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

7-12 Utara Correction | प्रत्येकासाठी महत्वाचं! कौटुंबिक सातबारा वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी?, हल्ल्यात घेऊ नका, माहिती लक्षात घ्या

Correction on Satbara Utara 7 12

7-12 Utara Correction | सातबारा शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा भक्कम पुरावा समजला जात आहे. परंतु याच सातबारा मध्ये अनेक प्रकारच्या चुका असतात त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या नावांमध्ये चुका, इतर हक्कांमध्ये एखादी चुकीने नोंद झालेली असणे,किंवा चुकीचे नाव सातबारा वर समाविष्ट असणे अशा प्रकारच्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असतात, व या चुका कशा दुरुस्त करणे याविषयीची माहिती सुद्धा अनेक शेतकऱ्यांना नसते त्यामुळे या चुका कशा प्रकारे आपण दुरुस्त करू शकतो या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अधिकार अभिलेखात म्हणजेच सातबारा किंवा एखाद्या महसूल नोंदवहीमध्ये जर काही चूक झाली असेल किंवा एखादा लेखन प्रमाणात म्हणजेच लिहिताना चूक झाली असेल,तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ ने अशी चूक किंवा लेखन प्रमाणात दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो.सातबारा चूक दुरुस्त करण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करून काही उपयोग नाही.त्यासाठी आपल्याला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो.

चौकशी करण्याचे आदेश:
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार तलाठ्याला देत असतात. पण या चुका दुरुस्त करण्यापूर्वी काही हितसंबंधी यांना नोटीस बजावणे आवश्यक आहे अशा चुका किंवा लेखन प्रमाणात झाल्याचे संबंधित पक्षकारांनी कबूल केले पाहिजे.

चुकीने नाव दाखल झाल्यास त्या व्यक्तीला तहसिलदाराकडून नोटीस:
जर आपण आपल्या सातबाऱ्यावरील एखादे नाव कमी करण्याविषयी जर अर्ज केलेला असेल किंवा ज्या व्यक्तीचे नाव चुकीने आपल्या इतर हक्कांमध्ये समाविष्ट झालेले आहे किंवा सातबाऱ्यावर त्यांचे नाव आहे, अशा व्यक्तीला तहसीलदार आपण अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तींना नोटीस बजावतात, आणि जर त्या व्यक्तीने नाव कमी करण्याविषयी कुठलाही आक्षेप किंवा त्याची कुठलीही तक्रार नसेल तर आपली विनंती मान्य होऊन ते नाव दुरुस्त होते आणि सातबारा वरून नाव कमी केले जाते.अशा प्रकारच्या सातबारावरच्या कोणकोणत्या प्रकारच्या चुका दुरुस्त करता येतात याविषयीची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

१. खातेधारकाचे नाव व शेरा दुरुस्ती:
सातबारा पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव लिहण्याचे राहून जाणे अशा प्रकारची चूक या कायद्या अंतर्गत दुरुस्त करता येते म्हणजे पाठीमागे जे दहा वर्षानंतर सातबाराचे पुनर्लेखन होत होते त्यामध्ये जर एखाद्या खातेदाराचे नाव किंवा एखादा शेरा चुकीने राहिलेला असेल तर पूर्वीच्या अभिलेखात तो असेल आणि नवीन अभिलेखात नसेल तर अशा प्रकारची चूक कलम १५५ अंतर्गत दुरुस्त करता येते.

२. कलम १५५ नुसार अभिलेखातील नाव कमी करणे:
सातबाऱ्यावरील काही नावे कमी करण्याचा आदेश झाला होता परंतु त्या आदेशानुसार अशी नावे कमी करण्यात आलेली नाहीत म्हणजेच आपण एखाद्या अभिलेखातील नाव कमी करणे विषयी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता परंतु तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारचे आदेश सुद्धा निर्गमित केले होते परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसेल तर अशा प्रकारच्या अंमलबजावणी आपणास १५५ कलमानुसार करता येते.

३. कलम ३२ ग नुसार मूळ मालकाचे नाव कमी करणे:
जर एखाद्या जमिनीची कूळकायदा कलम ३२ ग नुसार ठरलेली रक्कम मूळ मालकाला दिल्यानंतरही मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात राहिले असेल म्हणजेच कुळकायद्याविषयीचे हे कलम आहे या अंतर्गत कलम ३२ ग नुसार आपण मूळ मालकाला रक्कम दिली तरीही मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात असेल तर असे नाव आपणास कमी करता येते.

४. कलम १५५ अंतर्गत वारसाचे नाव किंवा जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये दुरुस्ती:
कलम १५५ अंतर्गत आपण जेव्हा जमिनीचे खरेदी व्यवहार करतो त्यावेळेस नोंदणीकृतदस्त यामधील महत्त्वाचा मजकूर जसे वारसाचे नाव किंवा जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये काही चूक झालेली असेल किंवा तसा उल्लेख सातबाऱ्यावर झाला नसेल तर आपल्याला कलम १५५ अंतर्गत अशाप्रकारची चूक सुद्धा दुरुस्ती करता येते.

५. फेरफार लेखन प्रमाण यामध्ये दुरुस्ती:
फेरफार सदरी नोंदविलेले एखाद्या वारसाचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यात आलेले नाही म्हणजेच एखादया वारसाचे नाव जर सातबाऱ्यावर आलेले नसेल तर ते सुद्धा या कायद्यानुसार आपल्याला आणता येते.यावरून असे लक्षात येते की कुठेतरी मूळ दस्ताऐवजात आदेशात केलेला उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल तरच सर्व हितसंबंधाचे म्हणणे विचारात घेऊन अशी चूक किंवा लेखन प्रमाण दुरुस्त करता येतो.

६. सातबाऱ्यावरील चूक दुरुस्ती:
कधीकधी मूळ अभिलेखामध्ये पूर्वीचे जे रेकॉर्ड असेल व त्यामध्ये जर तुमचे नाव व्यवस्थित असेल आणि तुम्ही जी चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज केलेला आहे ती चूक झालेली असेल मूळच्या अभिलेखत ती असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज करून त्या ठिकाणी सातबारावर चूक दुरुस्त करता येते आणि अशाप्रकारे ज्यांचे नाव कमी होणार आहे अशी ज्यांच्या ज्यांच्याशी संबंधित ती चूक आहे त्या सर्व हितसंबंधीताना अगोदर नोटीस दिल्या जाते आणि त्यांची जर कुठलीही तक्रार नसेल तरच अशा प्रकरणावर कार्यवाही होऊ शकते.

७. खरेदी व्यवहार केल्यानंतर सातबाऱ्याची नीट पाहणी करणे:
काही वेळेला खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर खरेदी करणारा स्वतःचे नाव सातबारा सदरी दाखल झाल्याची खात्री करीत नाही म्हणजेच खरेदी केल्यानंतर आपण सातबाऱ्यावर आपले नाव आले कि नाही याची खात्री करीत नाही त्यामुळे खरेदी देणारा मूळ मालकाचे नाव सातबारा सदरी तशीच राहते याचा फायदा घेऊन खरेदी देणारा म्हणजेच मूळ मालक त्याच जमिनीची विक्री अनेक लोकांना करतात. जरी प्रथम खरेदी घेणाऱ्या चे नाव सातबारा सदरी दाखल होणे आवश्यक असले तरी अशा अनेक खरेदी-विक्री व्यवहारामुळे पुढे अनेक प्रकारची कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते त्यामुळे प्रत्येकाने आपण केलेल्या व्यवहाराची नोंद गाव दप्तरी योग्य प्रकारे नोंदवली गेली आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे, म्हणजेच ज्या वेळेस आपण एखादा खरेदी व्यवहार करतो आणि दस्त नोंद झाल्यानंतर आपले नाव सातबारा सदरी लावली आहे किंवा नाही याची खात्री करत नाही आणि याच मुळे मूळ मालकाचेच नाव सातबारा वर राहते आणि तोच मालक परत त्याच जमिनी ची विक्री अनेक व्यक्तींना करू शकतो.

८. दर दहा वर्षांनी सातबाऱ्याचे पुनर्लेखन:
पूर्वीच्या काळी गैरव्यवहार होत होते आता सर्वजण या बाबतीत जागृत झाल्यामुळे असे प्रकार सहजासहजी घडत नाही तरीही अशा बाबतीत आपण दक्ष असणे आवश्यक आहे. दर दहा वर्षांनी सातबाऱ्याचे पुनर्लेखन करण्यात येते. असे पुनर्लेखन झाल्यानंतर प्रत्येक खातेदाराने सातबाऱ्याची नक्कल घेऊन आपल्याशी संबंधित सर्व नोंदी योग्य प्रकारे नोंदविल्या गेल्या आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी व दरवर्षी वेळोवेळी सातबाराची नक्कल घेऊन सर्व नोंदीची खातरजमा करावी आणि याबाबत काही संभ्रम असल्यास तात्काळ तलाठी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजेच आपण आपला सातबारा दर दहा वर्षांनी किंवा दरवर्षी नवीन करून घेतला पाहिजे.

९. कागदपत्रांचे वाचन:
सातबाऱ्याचे सविस्तर वाचन केले पाहिजे.आता सुद्धा असे अनेक शेतकरी आहेत की त्यांनी संपूर्ण सातबारा आत्तापर्यंत वाचलेला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे आपल्या शेतीचा सातबारा किंवा इतर आपले जमिनीशी संबंधित जे ही कागदपत्रे आहेत. फेरफार अशा प्रकारच्या कागदपत्राची आपण व्यवस्थित वाचन केले पाहिजे.अशा प्रकारे जर तुमच्या सातबारा मध्ये काही जर चुका झाल्या असतील तर तुम्हाला कलम १५५ तहसिलदार यांचेकडे अर्ज करुन अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करता येतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How to make correction on Satbara Utara 7 12 in Maharashtra check details on 22 February 2023 news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x