22 November 2024 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

एरंडोल नगरपालिकेत सफाई कामगार पदाची भरती | पगार १५ ते ४७ हजार | शिक्षण ७वी उत्तीर्ण

Erandol municipal recruitment 2021

जळगाव, १२ जुलै | एरंडोल नगरपालिकाअंतर्गत सफाई कामगार या पदाकरिता भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२१ आहे.

पदाचे नाव : सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता :
* ७ वी उत्तीर्ण
* मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
* लिहिता वाचता येणे आवश्यक
* न.प.च्या सेवेतील कमाल अनुभव असेल तर प्राधान्य

वयोमर्यादा :
या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त नसावा.

वेतन :
१५,००० ते ४७,६०० /-

उमेदवारांना सूचना :
* महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. बीसीसी-२०१८/प्र.क्र.२७/१६-ब (सी) दि.१९ एप्रिल २०१८ मधील तरतुदीनुसार नमूद पदाकरिता मेहतर व वाल्मिकी व्यक्तींची अनुसूचित जाती करिता वर्ग ४ मध्ये रिकाम्या जागा राखून ठेवलेल्या असल्याने नमूद सफाई कामगार वर्ग-४ या पदाकरिता वाल्मिकी व मेहेतर जात या प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवार पात्र ठरणार नाही.
* न.प. च्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ठेके पद्धतीने असलेल्या /न.प.च्या राज्यव्यापी सार्वत्रिक संपामध्ये सहभाग असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५ वर्षाने शिथील करण्यात येईल.
* जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या-त्या विभाग/कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेवूनच अर्ज करावा. अशी परवानगी अर्जासोबत सादर करावी. उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग/कार्यालय प्रमुखामार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही.
* उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा नगरपालिका कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा इतर गैरमार्गाचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल. या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतीम राहिल.
* अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने नगरपालिका कार्यालय, एरंडोलच्या संकेतस्थळ https://erandolmahaulb.maharashtra. gov.in यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत.
* उमेदवाराने दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच त्याचे विरुध्द कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला निकाली /चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे व त्याचा तपशिल दयावा.
* विहित नमुन्यात नसलेला आणि अपुर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
* सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास योग्य ते निकष लावुन पुढील प्रक्रियेकरिता उमेदवारांची लघुसूची तयार करण्याचे अधिकार सरळ सेवा भरती समितीस राहतील व त्यांचा निर्णय अंतिम राहिल व अशी तयार केलेली लघुसूची नगरपालिका कार्यालय, एरंडोल येथील सुचना फलक व https://erandolmahaulb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
* उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता व परिक्षेस बोलविल्यास स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
* सेवाप्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक व अन्य महत्वाची सुचना असल्यास त्याची माहिती नगरपालिका कार्यालय, एरंडोलच्या सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल परंतु तो बदल वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.
* वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला आवश्यक राहिल.
* अर्ज भरण्या पूर्वी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद असलेल्या अटी पूर्ण करीत असल्याबाबत प्रथम खात्री करून घ्यावी व त्यानंतरच अर्ज.
* या पदभरतीकरिता १०० गुणांची वस्तुनिष्ठबहुपर्यायी लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यात प्रत्येकी २ गुण असलेले ५० प्रश्न असतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Erandol municipal recruitment 2021 for sweepers post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x