22 November 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मनसे, भाजप, शिवसेना झाली, बाळ्या मामा आता काँग्रेसमध्ये | अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये

Suresh Balya Mama Mhatre

मुंबई, १३ जुलै | महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सध्या पक्ष प्रवेश पाहायला मिळत आहेत. एकाबाजूला गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने एकामागून एक असे दोन धक्के दिले आहेत. ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश बाळा मामा म्हणजे सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना, मनसे, भाजप ,शिवसेना त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते.

दुसरीकडे, शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena leader Suresh Balya Mama Mhatre will join congress party in presence of congress state president Nana Patole news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x