22 November 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | तुम्ही पाठदुखीनं ग्रस्त आहात? | हे आहेत घरघुती उपाय

Home remedies on back pain

मुंबई, १३ जुलै | आजकालच्या धावपळीच्या युगात व्यक्तीला अनेक शारीरिक आणि मानसिक आजारानं ग्रासलं आहे. त्यातल्या त्यात पाठदुखीचा आजार सर्वसामान्य झाला आहे. पाठदुखीचा त्रास होत नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. सामान्य वाटणारी पाठदुखीची समस्या दुर्लक्षित केल्यास कालांतराने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आपलं जगणं अक्षरश: वेदनादायी होऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी 5 घरगुती उपास सांगत आहोत.

काय आहे पाठदुखीची समस्या?
मानवी शरीर रचनेतील पाठ ही स्नायू, हाडे, कंबर, अस्थिबांधाची एक सिस्टम आहे. शरीराला आधार व हालचाल सुरळीत करण्यासाठी हे घटक एकत्र काम करतात. यातील एखाद्या घटकाची झीज झाली किंवा अपघातात दुखापत झाल्यास पाठदुखी ची समस्या उद्भवू शकते. ही समस्या सामान्य असून वेळेत उपचार केल्यास संभाव्य जटील समस्या टाळणे शक्य आहे.

हे आहेत पाठदुखीची करणे:
पाठदुखीची समस्या निर्माण होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. त्यात प्रमुख कारणांचा विचार केल्यास त्यात प्रमुख्यानं मणक्याचा कर्करोग, सांधेदुखीचा आजार, हाडं ठिसूळ होणं, वाढलेलं वजन, चुकीच्या पद्धतीनं झोपणं, जड वस्तू उचलणं, तासंतास एकाच जागी बसून काम करणं, अपघातात मणक्याला मार लागणं, वाहन चालवणं आदी कारणांमुळे पाठदुखीचा आजार निर्माण होऊ शकतो.

हे 5 घरगुती उपाय करू शकतात पाठदुखीपासून सुटका:
पाठदुखी हा सामान्य आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करणं भविष्यात धोकादायक ठरू शकतं. हा आजार बरा करणे तसेच वेळीच घरगुती उपचार करणं शक्य आहे.

* तेलानं हळूवार मालिश करावी:
पाठदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांनी दररोज रात्री झोपताना तेलाची मालिश करावी. नारळ किंवा मोहरीच्या तेलात चार ते पाच लसनाच्या पाकळ्या टाकून तेल चांगलं गरम करावं. नंतर तेल थंड झाल्यानंतर त्या तेलानं पाठीची हलक्या हातानं मालिश करावी.

* नियमित योगासनं करा:
भारतीय वैद्यक पद्धतीत योगासनाला विशेष महत्त्व असून योगद्वारा अनेक व्याधींवर मात करणं शक्य आहे. पाठदुखीवर काही योगासने प्रभावी ठरतात. यात त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन, पवनमुक्तासन हे आसनं नियमित केल्यास पाठदुखी कमी करण्यास मदत होते.

* कॅल्शियमयुक्त आहार घ्या:
हाडाचा ठिसूळपणा हे देखील पाठदुखीचे प्रमुख कारण आहे. आहारात साजूक तूप, दूध, उडीद, मासे अशा पदार्थाचं सेवन केल्यास शरीरात कॅल्शियमची मात्रा वाढते. हाडं मजबूत होताता आणि पाठदुखीची समस्या कमी करता येते.

* मिठाच्या पाण्यानं अंघोळ करा:
पाठदुखीच्या समस्येत स्नायूची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे स्नायू मोकळे करण्यासाठी मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आराम मिळतो.

* नियमित व्यायाम करणे:
सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी व्यायाम उत्तम मानले जाते. नियमित व्यायाम केल्यास पाठदुखी या समस्यांवर मात करता येते. नियमित व्यायामसह पायी चालणे हे उपाय देखील केल्यास सहज अराम मिळतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home remedies on back pain details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x