21 November 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | चुना-कात-तंबाखू शिवाय पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Health benefits of eating betel leaf

मुंबई, १३ जुलै | आज देखील कोणी पान खाणारं कोणी दिसलं की, ही एक वाईट सवय आहे म्हणून त्यांना चार ज्ञानाच्या गोष्टी समजावल्या जातात. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, पान खाण्याचे फार फायदे आहेत. पण चुना किंवा कात अशा तत्सम गोष्टी त्यात टाकून पान न खाता नुसतं पान खाण्याला प्राधान्य द्यावं. नुसतं पान खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होतात. पण हेच जर तुम्ही पानात तंबाखू किंवा चुना लावला तर त्याचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त आहे. नक्की याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ…

* पान खाल्ल्याने सर्दी, थकवा यांसारख्या समस्यांतून आराम मिळतो. याशिवाय यात अनेक आयुर्वेदिक गुणही आहेत.
* प्राचीन काळापासून सांगण्यात आलं आहे की, पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. नियमित पान खाल्ल्याने गंभीर आजारांपासूनही वाचता येतं.
* हिरड्या आणि दातांच्या दुखण्याने तुम्ही वैतागला असाल तर यावर पान हा एक चांगला पर्याय आहे. पान चाऊन खाल्यास या दुखण्यापासून आराम मिळतो.
* पान चाऊन खाल्ल्याने दातातील पायरिया रोगही नष्ट होतो आणि दाताचे अन्य विकारही होत नाहीत.
* पान खाल्ल्याने गुडघ्यांच्या दुखण्यालाही आराम मिळतो आणि यामुळे हाडं मजबूत होतात.
* पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करा आणि ज्याठिकाणी इजा झाली आहे तिथे लावा, लगेच आराम मिळेल.
* तोंड आलं असेल तर पान खाल्ल्याने आराम मिळेल. पानाला तूप लावून ते पान खा. याचा जास्त चांगला फायदा होतो.
* सर्दी झाल्यास पानात लवंग घालून खा, याशिवाय पानात खडीसाखर टाकून खाल्यासही आराम मिळतो.
* श्वास घ्यायला त्रास होत असेल तर किंवा छातीत दुखल्यासारखं वाटत असेल तर तव्यावर पान थोडं शेकवा आणि त्यानंतर खा. लगेच आराम मिळेल.
* जर प्रत्येकवेळी थकवा जाणवत असेल तर पानात वेलची घालून खाल्याने लगेच आराम मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of eating betel leaf in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x