18 April 2025 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

माझे नेते मोदी आणि शहा सांगत पंकजांनी फडणवीसांच्या नेतृत्वाला नाकारले? - सविस्तर वृत्त

Pankaja Munde

मुंबई, १४ जुलै | पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हेच माझे नेते आहेत. मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी नेता आहे. महाराष्ट्राच्या पदावर मी नाही. माझे नेते हे राष्ट्रीय स्तरावरचे आहेत, असा खणखणीत इशारा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांच्या भगिनी तथा बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश झाला नाही. त्याचे तीव्र पडसाद उमटले. बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पंकजा समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन बंडाचे रणशिंग फुंकले. या राजीनामा सत्रानंतर पंकजा यांनी मंगळवारी वरळी येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात समर्थकांचा मेळावा घेतला. या वेळी व्यासपीठावर पंकजा, डॉ. प्रीतम आणि यशश्री मुंडे या तिन्ही भगिनी उपस्थित होत्या. परंतु केवळ पंकजा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पंकजा यांनी कार्यकर्त्यांचे नुकसान नको म्हणून धर्मयुद्ध टाळण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही स्पष्ट केले. त्याच वेळी ‘आपण हे घर कष्टाने अन् प्रेमाने बांधले असून आपलेच घर आपण का सोडायचे? ज्या दिवशी छत अंगावर पडेल, जेव्हा वाटेल इथे राम नाही, तेव्हा बघू असे सांगून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.

दिल्लीत नेमके घडले काय?
राजधानी दिल्लीत रविवारी भाजपच्या सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना मोदींनी खडसावले त्यामुळेच दिल्लीहून परत येताच नाराज कार्यकर्त्यांना पंकजा यांनी समजावण्यासाठी तातडीने मेळावा घेतला अशी चर्चा होती. त्याबद्दल मंगळवारी पंकजा यांना छेडले असता, आपल्याला केंद्रीय नेतृत्वाने झापलेले नाही. उलट कार्यकर्त्यांची नाराजी मी नेतृत्वासमोर मांडली. त्यांच्या सूचनेनुसार मी तुमच्याशी जाहीर संवाद ठेवला आहे, असे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला नाकारले:
‘माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा व जे. पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात काहीतरी चांगले आहे, असा मला विश्वास आहे,’ असे म्हणत पंकजा यांनी राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एकदाही नामोल्लेख केला नाही. तसेच त्यांचे नेतृत्व आपण मानत नाही, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

राज्यातून कार्यकर्त्यांची हजेरी
या वेळी ‘पंकजाताई, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं… परत या… परत या… गोपीनाथ मुंडे परत या… प्रीतम ताई, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है … महाराष्ट्र का नेता कैसा हो… पंकजाताई जैसा हो… अशा घोषणा समर्थक देत होते. बीड, अहमदनगर, बुलडाणा, परभणी, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक इथून शेकडो पदाधिकाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP Leader Pankaja Munde rejected leadership of Devendra Fadnavis indirectly news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या