18 April 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

ते काय बोलतात, कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अजिबात अवलंबून नाही - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, १४ जुलै | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पटोले यांनी काँग्रेसचे नेतृत्व हाती घेतल्यापासून ते आतापर्यंतची परिस्थिती, त्यांची दरदिवशी खळबळ निर्माण करणारी वक्तव्यं यावर राऊतांनी आजचा सामना अग्रलेख लिहिला आहे. पटोले नेमके काय आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांची वक्तव्यं का चर्चेत असतात, यावर आजचा अग्रलेख आहे. अग्रलेख वाचल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील भारावून जातील असा हा अग्रलेख आहे.

नाना पटोले विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत. ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अजिबात अवलंबून नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल, असं आजच्या अग्रलेखात राऊत म्हणाले.

नानांच्या वक्तव्यांवर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अवलंबून नाही:
लोणावळय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी ‘ताव’ मारला की, ‘आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही.’ नाना पुढे असेही म्हणाले की, ‘काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे’. नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार ‘स्वबळा’स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे, असा टोला ही त्यांनी नाना पटोलेंसह सरकार पडण्याची स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MP Sanjay Raut talked on congress state president Nana Patole in Saamana Editorial news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या