22 November 2024 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | या '७' शारीरिक समस्या आणि आजारांमुळे गर्भपाताचा धोका वाढतो - नक्की वाचा

Reasons behind miscarriage

मुंबई, १४ जुलै | स्मोकींग, टॉक्सिन्स, ड्रग्स, अल्कोहोलचे अति सेवन यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण गरोदरपणात उद्भवणाऱ्या हार्मोनल समस्या किंवा इन्फेकशन यामुळे देखील गर्भपात होण्याची शक्यता असते, असे या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. PCOS मध्ये स्त्री च्या शरीरातील testosterone चे प्रमाण वाढते. त्यामुळे मासिक पाळीचे चक्र आणि ओव्हुलेशन अनियमित होते. त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. तसंच त्यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स होते. त्यामुळे endometrial lining ची वाढ नीट होत नाही. परिणामी गर्भाची वाढ होण्यास अडथळे येतात.

हायपोथायरॉइजम:
थायरॉईड हार्मोनमुळे सेल्युलर फंक्शन सुरळीत होण्यास मदत होते. थायरॉईडच्या अनियमित प्रमाणाचा परिणाम गरोदर राहण्याच्या क्षमतेवर होतो. जर यावर वेळीच उपचार न केल्यास गर्भपात होण्याची शक्यता वाढते. थायरॉईडच्या कमी प्रमाणामुळे ओव्यूलेशनमध्ये अडथळे येतात. त्यामुळे इन्फर्टिलिटी आणि गर्भपाताचा धोका वाढतो.

इन्फेकशन:
इन्फेकशनपासून विशेषतः गरोदरपणात दूर राहणे गरजेचे आहे. बॅक्टरील इन्फेकशन मुळे गर्भपाताचा धोका वाढतो. काही बॅक्टरीयांचा परिणाम गर्भाशयाच्या endometrial lining वर होतो. त्यामुळे गर्भाची वाढ होण्यास अडथळे येतात आणि गर्भपात होतो.

Structural abnormalities:
अनेकांना माहित नाही की, गर्भाशय किंवा cervix चे स्ट्रक्चर यामध्ये काही समस्या असल्यास गर्भपाताचा धोका वाढतो. गर्भाशयाचा अॅबनॉर्मल आकार, फॅब्रॉइड्स यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.

Chromosomal abnormalities:
उशिरा होणारे ५०% गर्भपात हे गर्भातील Chromosomal abnormalities होतात. खराब chromosomes मुळे बाळाची वाढ नीट होत नाही आणि गर्भपात होतो. ३० शी च्या शेवटच्या टप्प्यात किंवा ४० शी च्या सुरुवातीच्या टप्प्यात गरोदर राहिल्यास हा धोका वाढतो.

बाळाची हालचाल घटणे:
जर बाळाला गर्भाशयात प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागला तर त्याची वाढ खुंटते. हे अचानक झाले तर बाळाच्या हालचाली कमी होतात. याकडे दुर्लक्ष झाल्यास अनर्थ ओढवू शकतो. बाळाच्या हृदयस्पंदनांच्या काही तपासण्या, रक्त प्रवाह कसा आहे हे पाहाण्यासाठी डॉपलर सोनोग्राफी करून डॉक्टर इलाज ठरवतात.

अकाली प्रसूतिवेदना:
जर दर थोडय़ा मिनिटांनी पाठीत आणि पोटात दुखून पोट घट्ट होऊ लागले तर अकाली प्रसूती होऊ शकते. यासाठी डॉक्टर बहुधा गोळ्या, इंजेक्शने देऊन कळा शमवतात. गर्भपाताचं सर्वसाधारण कारण क्रोमोसोम्समध्ये समस्या होणं असू शकतं जी गर्भातील भ्रूण पूर्णत: विकसित होण्यास अडथळा निर्माण करतं. अनुवांशिक कारणाव्यतिरिक्त खालील कारणं देखील गर्भपातास कारणीभूत असू शकतात.

हार्मोन्सचा असामान्य स्तर:
बाळाच्या विकासासाठी गर्भावस्थेत हार्मोन्सचा स्तर खूप महत्त्वाचा असतो. हार्मोन्सची असामान्य पातळी गर्भपाताचं कारण बनू शकते.

मधुमेह:
अनियंत्रित मधुमेह गर्भपाताची शक्यता वाढवतो.

धोकादायक गोष्टींशी जवळीक:
प्रदुषण, केमिकल्स, एनव्हायरमेंट रेडियेशन्स, टॉक्सिक पदार्थांच्या संपर्कात येणं.

वेदनाशम गोळ्या:
वेदनाशम गोळ्या जसं की इबुप्रोफेन, नेप्रोक्सन इत्यादीचा वापर

धुम्रपान:
गर्भावस्थे दरम्यान अतिप्रमाणात मद्यपान आणि धुम्रपान करणं

अवैध औषधांचा वापर:
काही अॅंटीबॉडीज शरीराची सुरक्षा करता तर काही नुकसान! यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं हे देखील गर्भपातास कारणीभूत ठरु शकतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Reasons behind miscarriage during pregnancy in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x