22 April 2025 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या
x

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही | त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही | फडणवीसांच्या या विधानाचा अर्थ काय?

Devendra Fadnavis

मुंबई, १५ जुलै | भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांच्यात आणि फडणवीसांदरम्यान सर्वकाही ठीक नसल्याचं अप्रत्यक्षरीत्या सूचित केलं होतं. त्यातून भाजपामध्ये त्यांच्या विरोधात अंतर्गत धुसफूस असल्याचं देखील अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट झालं आहे. तसेच मला नाराजी व्यक्त करायची असेल तर ही जागा देखील कमी पडेल असे म्हटल्याने त्यांच्या भविष्यातील बंड करण्याच्या शक्यता देखील निर्माण झाल्या होत्या. मात्र आता फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर त्यात भर पडली आहे.

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं म्हणत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा होती. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजांच्या भाषणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Devendra Fadnavis reaction over Pankaja Munde statement in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony