22 November 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Health First | दातदुखीच्या भयंकर वेदनांवर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा

Home remedies on toothache

मुंबई, १५ जुलै | दातदुखीला छुपा शत्रू म्हटलं जातं. हे दुखणं फारच त्रासदायक असतं. यामुळे रोजचं काम करणं देखील कठीण होऊन जातं. सारख्या दुखण्यामुळे कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. त्याचबरोबर भयंकर वेदनांनी अस्वस्थता वाढत असते. दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण पेनकिलर घेतात. मात्र, तुम्हाला माहित नसावे. पेनकिलर हे आरोग्यास हानाकारक आहे. (toothache treatment) पेनकिलरच्या अतिसेवनामुळे तुम्हाला दुसऱ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पेनकिलर टाळलेलंच बरं. आज आम्ही आपल्यासाठी दातदुखीवर काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. तुम्ही ते फॉलो करू करून एका मिनिटात दातदुखीपासून स्वत: ची सूटका करू शकतात.

लवंगाचं तेल रामबाण ( Benefit of Clove oil):
दातदुखीपासून सुटका करण्यासाठी लवंगाच्या तेलाचे (Clove oil) थेंब कापसाच्या बोळ्यानं दुखणार्‍या दातावर लावावं. लवंगाचं तेल हे दातदुखी दूर करण्यास फारच उपयुक्त आहे.

आल्याचा लहानसा तुकडा चघळा:
सुंठाची पावडर (Ginger) देखील दुखणाऱ्या दातावर लावू शकतात. सुंठाची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट दुखणार्‍या दातावर लावावी. त्यामुळे दातदुखीपासून तात्काळ आराम मिळेल. तसेच आल्याचा (Ginger) लहानसा तुकडा चघळत राहा. आल्याचा रस दुखणार्‍या दाताकडे वळवण्याचा प्रयत्न करा. आल्यात जंतूनाशक घटक आहे. तत्काळ आराम मिळतो.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा:
दातात ठणक बसत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. दातांमध्ये अन्नपदार्थ अडकून दातात वेदना होता. त्यावर हा एक उत्तम उपाय आहे. मिठाच्या पाण्यामुळे दातात अडकलेले अन्नकण निघून जातात. मीठ हे डिसइनफेक्टन्ट असल्यामुळे ते दातातील विषाणू मारतात. दातांच्या भोवताली सूज किंवा जखमा असतील तर त्या देखील लवकर बऱ्या होतात.

लसणीच्या कळ्या चावणे: (Garlic Benefit)
लसूण जखम बरी करण्यासाठी वापरण्यात येणारं आयुर्वेदिक पदार्थ आहे. प्राचिन काळात वेदना, दाह कमी दूर करण्यासाठी लसणाचाच वापर केला जात होता. लसूण बॅक्टेरिया मारायला जहाल औषध आहे. पण दातदुखीवर सुद्धा गुणकारी आहे. लसणीची पेस्ट करून ती दुखणाऱ्या दातावर लावावी किंवा कच्ची लसूण चावून त्याचा रस दुखणाऱ्या दातापाशी नेऊन ठेवावा.. दातदुखीवर लवकर आराम पडेल..

हायड्रोजन पेरॉक्साईडने चूळ भरा:
दातांवर प्लाक (किड लागणे) असेल किंवा हिरड्यातून रक्त येत असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईडची चूळ भरा. तोंडातील किटाणू मरून दातदुखी दूर होऊन हिरड्यांची सूज देखील कमी होईल.

बर्फाचा शेक द्या:
दुखणाऱ्या दातावर बर्फाचा शेक द्या. खेळाडू दुखापत झालेल्या भागावर ज्याप्रमाणे बर्फाची बॅग ठेवून शेकतात, अगदी त्याच प्रमाणे ही क्रिया करायची आहे. आईसबॅग किंवा एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दुखत असलेल्या दातांच्या बाहेरून शेक द्या. बर्फाच्या थंडाव्याने तिथले रक्त गोठतं आणि वेदना कमी होतात.

पेपरमिंट टी बॅगचा असा वापर करा:
हल्ली ग्रीन टीचं चलन वाढलं आहे. टी बॅग घरात सहज उपलब्ध असते. दातातील वेदना कमी करण्यासाठी आणि हिरड्यातील सेन्सिटीव्हीटी कमी करण्यासाठी पेपरमिंट फ्लेवरच्या टी बॅगचा तुम्ही वापक करू शकतात. आम्ही सांगितलेले सर्व उपाय अत्यंत सोपे आहेत. तुम्ही घरच्याघरी आजमावून पाहू शकतात. मात्र अतिवेदना, हिरड्यात पू किंवा जास्त सूज असेल. दातदुखीमुळे तुम्हाला ताप आली असेल तर दंतवैद्याचा (Dentist) सल्ला घ्यावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home remedies on toothache in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x