22 November 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Health First | उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवायला टोमॅटो फायदेशीर - नक्की वाचा

Eating tomatoes beneficial to control hypertension

मुंबई, १५ जुलै | भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्‍या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि अनियमित रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत. उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंशनच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास तसेच सतत चढ उतार होत असल्यास या समस्येलाआटोक्यात ठेवणं गरजेचे आहे. अन्यथा यामधून काही कार्डियोव्हस्क्युलर आजारांचा धोका बळावतो. पण टोमॅटोच्या सेवनामुळे हृद्यविकाराचा हा धोका कमी करण्यास मदत होते. असा निष्कर्ष अनेक संशोधनातून सामोरी आला आहे.

2009 च्या Cardiovascular Drugs and Therapy मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जेवणात ACE inhibitor drugs, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि diuretics कमी असलेल्या टोमॅटोचा अर्क दिल्यास रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

सामान्य रक्तदाब 120(systolic) -80 (diastolic) इतका असतो. टोमॅटोच्या सेवनानंतर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये 10 mmHg (systolic) तर 5mmHg (diastolic) चे प्रमाण कमी झाले. तसेच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. American Heart Journal मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसारही, अ‍ॅन्टीऑक्सिडंटयुक्त टोमॅटोचे सेवन केल्यानंतर grade-1 hypertensive रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होते.

रक्तदाबाच्या समस्येमध्ये टोमॅटो कसा ठरतो फायदेशीर ?
टोमॅटोमध्ये lycopene आणि beta-carotene यासारखे प्रभावी अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स आढळतात. आहारात टोमॅटोचा समावेश केल्याने घातक, विषारी घटक बाहेर पडण्यास मदत करतात.फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासोबतच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. यासोबतच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ई घटक आढळतात. यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि पोटॅशियमचा मुबलक साठा असतो.या मिनरल्समुळे शरीरात फ्लुईड इलेक्ट्रोलाईटसचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते.

रक्तदाबाची समस्या आटोक्यात ठेवण्यास टोमॅटो फायदेशीर ठरत असला तरीही गाऊटचा त्रास असणार्‍यांनी मात्र टोमॅटोचे सेवन टाळावे. इतर भाज्यांच्या रसासोबत किंवा सलाडमध्ये टोमॅटोचा वापर करू शकता. यासोबतच टोमॅटो रसम, सूप आणि चटणी या स्वरूपातही टोमॅटो खाऊ शकता. टोमॅटो खरचं वाढवते ‘किडनी स्टोन’ची समस्या ? हेदेखील जाणून घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Eating tomatoes beneficial to control hypertension in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x