22 November 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Special Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी

Andhra style tomato Chutney recipe

मुंबई, १५ जुलै | आपल्याकडे अनेक प्रकारे चटण्या बनवल्या जातात. इडली, डोसा, वडा आणि अगदी चपाती सोबत देखील चटणी आवडीने खाल्ली जाते. टोमॅटो चटणी- आपण पण बनवतो परंतु, ही तेलगू स्टाईलची चटणी काही ठराविक साहित्यात आणि काही कमी तेलात झकास बनते. जाणून घेऊया याची खास रेसिपी.

संपूर्ण साहीत्य:
* टोमॅटो: २ (मध्यम आकाराचे)
* हिरव्या मिरच्या: २-३ (जर तुम्हाला तिखट खाण्याची सवय असेल तर तुम्ही त्यानुसार मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता.)
* लसूण: थोडं
* चिंच: थोडी
* तेल: २ चमचे
* मीठ: चवीनुसार.

चटणी बनवण्याची पद्धत:
१. टोमॅटो धुवून पुसून घ्या आणि बारीक, उभे चिरा. हिरव्या मिरच्या बारीक चिरा म्हणजेच एका मिरचीचे ४ तुकडे करा.

२. पॅनमध्ये २ चमचे तेल घ्या आणि तेल तापल्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या घ्याला. त्याचा रंग बदल्यांनंतर त्या एका भांड्यात काढा. मग पॅनमध्ये टोमॅटो घाला आणि ७-१० मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवा. मधूनमधून ढवळत रहा. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. हळूहळू पॅनच्या बाजूने तेल सुटू लागेल.

३. टोमॅटो काही प्रमाणात शिजल्यानंतर त्यात थोडी चिंच घाला किंवा चिंच पाण्यात भिजत घाला आणि इतर पदार्थांबरोबर वाटून घ्या.

४. जिरं, आलं, लवंग, हिरव्या मिरच्या, चिंच आणि टोमॅटो यात चवीनुसार मीठ घाला आणि एकत्रितपणे ग्रँड करा. त्याची मऊसर पेस्ट बनवा.

५. गरम भात किंवा पराठ्या सोबत तुम्ही टोमॅटो चटणी खाऊ शकता. तसंच सॅन्डविच आणि चपातीला लावून देखील तुम्ही खाऊ शकता. फ्रेंच फ्राईज किंवा नॅचोज सोबत देखील ही चटणी छान लागते.

महत्वाची नोट:
१. यात तुम्ही सुकं खोबरं देखील घालू शकता. त्यासाठी त्याचे बारीक काप करा. तव्यावर भाजा आणि चटणीत घाला. त्यामुळे चटणी अधिक काळ टिकेल व त्याची चव पण सुधारेल.
२. चटणी तिखट झाल्यास त्यात अजून थोडा टोमॅटो आणि खोबरं घाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Andhra style tomato Chutney recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x