Special Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी
मुंबई, १५ जुलै | गरमागरम मॅगी असो किंवा सॅन्डव्हिच, समोसे, वडे, कोथिंबीर वडी,कट्लेस या सार्यांनीच चव अधिक वाढते ती म्हणजे टोमॅटो केचअपमुळे. बाजारात विविध स्वादांमध्ये टॉमॅटो केचअप उपलब्ध असतात. पण त्याचा स्वाद वाढवण्यासाठी अनेकदा त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह वापरले जातात. असा टोमॅटो केचअप लहान मुलांनी वरचे वर खाणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच टोमॅटो कॅचअपची चव तशीच राखत घरच्या घरी टॉमॅटो कॅचअप कसा बनवावा ते आपण पाहणार आहोत. मग जाणून घ्या घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी स्टाईलने कसा बनवाल टोमॅटो केचअप.
टोमॅटो केचअपसाठी लागणारे साहित्य:
* 1 कप शिजवलेला लाल भोपळ्याचा पल्प
* 1 कप ताज्या टोमॅटोची प्युरी ( हे टोमॅटो वाफवू नका)
* 200 ग्रॅम पॅकेज्ड टोमॅटो प्युरी
* 1/3 कप साखर (टोमॅटोच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण कमी / जास्त होऊ शकते)
* 2 टीस्पून व्हिनेगर
* चिमुटभर मीठ
* 8 काळामिरीचे दाणे
* 4-6 लवंगा
* चिमुटभर चिली फ्लेक्स (गरज असल्यास) ( तुम्हांला टोमॅटो केचअप थोडा तिखट हवा असल्यास अधिक चिली फ्लेक्स वापरा)
* 4टीस्पून कांद्याची पावडर
* 1/2 टीस्पून लसणाची पावडर
संपूर्ण कृती:
* जाड स्टिल पॅनमध्ये साखर कॅरमलाईज्ड करा.
* प्रेशर कुकरमध्ये लाल भोपळ्याची प्युरी थोड्याश्या पाण्यामध्ये मिसळून थोडेसे शिजवा. शिजलेला भोपळ्याचा पल्प मिक्सरमध्ये एकत्र करा.
* त्यानंतर भोपळ्याची आणि टोमॅटोची प्युरी खोलगट भांड्यामध्ये एकत्र करून शिजवा.
* काही वेळाने त्यामध्ये पॅकेज्ड प्युरीदेखिल मिसळा. हे मिश्रण घट्ट होईपर्यत शिजवणे गरजेचे आहे.
* थोड्या वेळाने साखरेचे कॅरेमल,व्हिनेगर,आणि इतर मसाले,मीठ व कपभर पाणी मिसळा. त्यानंतर पुन्हा हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
* सारे मिश्रण साधारणपणे सुमारे 45 मिनिटं हे मिश्रण नीट शिजवणं गरजेचे आहे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
* त्यानंतर सारे मिश्रण नीट एकजीव करून गाळणीने गाळून घ्या.
* गाळलेले मिश्रण नैसर्गिकरित्या थंड होऊ द्यावे.
* थंड झालेले मिश्रण काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Home made tomato ketchup recipe in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार