22 November 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, रस्ते आणि रेल्वे वाहतूक प्रभावित

Rain Update

मुंबई, १६ जुलै | शहरात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहर विभागापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

उपनगरात पावसाचा जोर:
मुंबईत रात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तीन तासात मुंबई शहरात 36 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 75 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री 8 ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात मुंबई शहरात 64.45 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 120.67 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 127.16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाणी साचले, वाहतुकीवर परिणाम:
रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, किंग सर्कल, सायन, अंधेरी सबवे आदी सखल भागात पाणी साचले. सखल भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसामुळे पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच सायन येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम:
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक फटका बसला आहे. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकलची गती मंदावली आहे. तसेच हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते किंग सर्कल दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बरची ही वाहतूक मंदावली होती जवळजवळ 20 ते 25 मिनिटे उशिराने मध्य आणि हार्बर च्या लोकसेवा धावत होत्या. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या एकामागे एक खोळंबलेल्या होत्या. मात्र आता मुंबईत पाऊस थांबल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे मात्र सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना आज लेट मार्क लागलेला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Heavy rain in Mumbai since night news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x