22 November 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अध्यात्म कट्टा | तुमचीही साडेसाती सुरु आहे का? | मग हे उपाय अवश्य करा

Remedy on Shani Sadesati

मुंबई, १६ जुलै | साडेसाती या शब्दालाही आपण घाबरतो. साडेसातीच्या काळात सगळे वाईटच घडते, असा आपण समज करून घेतलेला आहे. परंतु साडेसाती हा आपला परीक्षा काळ असतो. त्यात उत्तीर्ण झालो तर आयुष्यभराची शिकवण मिळते. त्यामुळे या अवघड काळाला सामोरे जाण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पहा. (Remedy on Shani Sadesati as per Adhyatma)

साडेसातीच्या काळात शनि देवांची कृपा व शांतीसाठी तीळ, उडीद, मिरपूड, शेंगदाण्याचे तेल, लोणचे, लवंगा, तमालपत्र आणि काळे मीठ या पदार्थांचे गरजूंना दान करावे. शनी देवांची आणि हनुमंताची पूजा करावी. शनिदेवांच्या नावे दान म्हणून काळे कपडे, बेरी, काळी उडीद, काळ्या चपला, काळे तीळ, लोखंड, तेल इत्यादी वस्तूंचेही दान करता येते.

हे दान तसेच शनी देवाची पूजा केल्यास साडेसातीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शनिदेवांना दानशूर व्यक्ती आवडतात. आपल्या कृतीमुळे प्रसन्न होऊन ते साडेसातीच्या काळात आपल्याला मार्ग दाखवतात. तसेच, कुंडलीतील दुष्परिणामांशी संबंधित अडचणींपासून आपले रक्षण करतात अथवा परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ देतात.

शनिदेव हे पृथ्वीचे दंडाधिकारी आहेत:
ज्योतिषाचार्य म्हणतात की शनिदेव सूर्यपुत्र आहेत. शनिदेव यांना कर्माची आणि न्यायाची देवता देखील म्हटले जाते. शनिदेवाने भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने खूष होऊन भगवान शिवाने त्यांना नवग्रहांमधे श्रेष्ठ असल्याचे वरदान दिले. म्हणाले की आपण पृथ्वीलोकचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी व्हाल. तू लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे न्याय व शिक्षा देशील.

ज्योतिषाचार्य म्हणतात की जे चांगले कर्म करतात तेच शनिदेवाला प्रसन्न करतात. त्याच वेळी, जे वाईट कृत्य करतात त्यांना शनी देवाची भीती वाटते. त्यांचे म्हणणे आहे की शनिदेवांना घाबरण्याऐवजी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या कृतीत सुधारणा देखील केली पाहिजे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Remedy on Shani Sadesati as per Adhyatma news updates.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x