22 November 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते? | ED भाजपच्या इशाऱ्यावर नाचतंय - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

मुंबई, १६ जुलै | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.

मागील काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावला होता. मात्र प्रकृतीचे कारण देऊन अनिल देशमुख हे चौकशीला हजर राहिले नव्हते. दरम्यान ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. यांच्या केलेल्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर देशमुख हे अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीलाच सवाल केला आहे. एखाद्या आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवालच हसन मुश्रीफ यांनी केला आहे. सीबीआय, ईडी या संस्था भाजपच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. या संस्था जे जे विरोधक असतील त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्याची बातमी आल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधला. परमवीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मुकेश अंबानी यांच्या घरा बाहेर स्फोटक ठेवली त्याचा उलगडा झाला नाही. स्फोटक का ठेवली? मास्टर माईंड कोण याचा शोध एनआयए घेऊ शकली नाही. वाझेची चौकशी बाजूलाच राहिली. आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवाल करतानाच मुद्दाम हे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Hasan Mushrif first reaction on ED attached Anil Deshmukh’s property news updates.

हॅशटॅग्स

#ED(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x