22 April 2025 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

मनसेतील नेत्यांसोबत वाद वाढतच गेला आणि संयम संपल्याने मी शिवसेनेत प्रवेश केला - आदित्य शिरोडकर

Raj Thackeray

मुंबई, १७ जुलै | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने धक्का दिला. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काल शिवबंधन हाती बांधलं. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं. यात एक मनसे नेता आणि सरचिटणीस असा समावेश करण्यात आला होता. यात मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्यावर उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. कालपासून वाद रंगल्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कार्यपद्धती पाहून, त्यांच्या कामापासून प्रेरीत होवून मी शिवसेनेत प्रवेश घेतला, असे आदित्य शिरोडकर यांनी म्हटलंय. मनसेच्या स्थापनेपासून 2012 ची विधानसभा असेल किंवा त्याही पुढील निवडणुका असतील. एकाच पक्षात काही नेत्यांमध्ये मतभेद होतात, पण कालांतराने ते वाढतच गेले, अखेर संयम संपल्यानंतर मी काल शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य शिरोडकर यांनी मनसे स्पष्टीकरण दिलं. राजकारणात काही तत्त्व असतात, ते पाळले पाहिजेत. वैयक्तिक राजकीय विषय आहेत, ते प्रसारमाध्यमांसमोर बोलणं चुकीचं होईल, म्हणून मी जास्त खोलात जात नाही, असेही शिरोडकर यांनी म्हटलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Aditya Shirodlar clarification over why he left MNS party news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या