8 January 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

'लाव रे तो व्हिडिओ' नंतर राज ठाकरेंचं आता 'बघा रे माझे व्हिडिओ' | 'ते' व्हिडिओ भाजपाला पाठवणार

Raj Thackeray

मुंबई, १९ जुलै | २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास १० जंगी सभा घेत मोदी सरकारविरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यांची पोलखोल केली होती. विशेष म्हणजे मनसेने १० सभांच्या आयोजनावर जेवढी मेहनत आणि पैसा खर्च केला असेल, तेवढा त्यांनी स्वतःच्या पक्षातील किमान २ जागांसाठी जरी जोर लावला असता तर मनसेचा किमान एक खासदार आज लोकसभेत असला असता. मात्र त्यांनी तसे न करता केवळ मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी जी ताकद आणि अर्थकारण खर्ची घातलं, त्याने त्यांच्याविरोधातच प्रश्न चिन्हं निर्माण झालं होतं. मात्र आता ‘लाव रे तो व्हिडिओ’ ‘नंतर बघा रे माझे व्हिडिओ’ अशी वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.

कारण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहावर मुक्काम असल्याने या नेत्यांची रविवारी (दि.१८) सकाळी भेट झाली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असली तरी राज यांच्या पक्षाची परप्रांतीयांविषयीची भूमिका समजून घेण्यासाठी ते त्यांच्या बिहारमध्ये व्हायरल झालेल्या भाषणाचा व्हिडीओ आपल्याला पाठवणार असून तो ऐकणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाजप कार्यालयात पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच ठाकरेंच्या भेटीचा तपशील दिला. सध्या तरी भाजप-मनसेच्या युतीची काही चर्चा नाही. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने मनसेची परप्रांतीयांविषयीची भूमिका चालणार नाही. स्थानिकांना ८० टक्के राेजगार ही भूमिका सर्वांचीच आहे. तशीच भूमिका राज यांची असली पाहिजे, असे पाटील म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Chief Raj Thackeray will sent his video of statement regarding migrants to BJP state president Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x