22 November 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

एकाचवेळी मिळणार १०'वीचे गुणपत्रक आणि सनद | विद्यार्थ्यांना सनदसाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही

SSC Result

मुंबई, १९ जुलै | राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालनंतर आजवर ८ दिवसाच्या अंतराने गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र आता निकालानंतर मिळणाऱ्या गुणपत्रिकारबरोबरच सनद देखील मिळणार असल्याची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात.

परंतु मागील वर्षीपासून कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यभरातील शाळा महाविद्यालय बंद आहेत. तर दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे यंदा परीक्षा रद्द करत नववीच्या मूल्यांकनावर आधारित दहावीचा निकाल जाहिर करण्यात आला. यावेळी मूल्यांकनाची पद्धत बदलल्याने अनेक अडचणी बोर्डासह शाळांना आल्या आहेत.

दरम्यान, नुकतेच लागलेल्या निकालातील त्रुटी दूर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना देखील काही शंका असल्यास दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान या लागलेल्या निकालाचे गुणपत्रक येत्या १०-१२ दिवसांत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबरोबरच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर सनदसाठी वाट पहावी लागत असे ती सनद गुणपत्रिकेबरोबरच देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 10th Class results at the same time students will get the marks and charter of class 10th news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x