22 December 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

पोर्नोग्राफिक प्रकरणात सहभागाचा संशय | शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

Raj Kundra

मुंबई, २० जुलै | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा हा अडचणीत सापडला आहे. गुन्हेशाखेने पोर्नोग्राफिक फिल्मस आणि हे फिल्म काही अॅपमधून प्रदर्शित केल्याबद्दल त्याला अटक केली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले, की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफिक फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबईत अश्लील सिनेमा व चित्रफित बनवले जात असून ते मोबाईल ॲपद्वारे प्रदर्शित केली जात होते. याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत होती. त्याच बरोबर याप्रकरणी राज कुंद्राचीही चौकशी करण्यात आली होती. आज सगळ्या प्रकरणाचे कुंद्रा मुख्य सूत्रधार आहेत, असे पुराव्यांनिशी दिसून येत आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. यापूर्वीही राज कुंद्राची पोलिसांनी विविध प्रकरणात चौकशी केली होती.

2019 मध्ये ईडीने केली होती राज कुंद्राची चौकशी:
इक्बाल मिर्ची प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रणजीत सिंग बिंद्रा या आरोपीच्या जबाबावरुन कुंद्रा याचे नाव समोर आले आहे. कुंद्रा याचे इक्बालसोबत संबंध असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. 2011 मध्ये आर.के.डब्ल्यू. नावाची कंपनी कुंद्रा यांनी विकत घेतली होती. याबरोबरच मुंबईतील विमानतळाजवळ एक भूखंडही कुंद्रा यांनी खरेदी केला होता. मात्र, या प्रकरणात आपले इक्बालसोबत कुठलेही संबंध नव्हते, असे म्हणत कुंद्रा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

पहाटे करण्यात आली वैद्यकीय तपासणी:
पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारा राज कुंद्राला गुन्हे शाखेच्या कार्यालयातून जे.जे. रुग्णलायत वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर त्याला राज कुंद्राला रुग्णालयात नेण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Police Crime Branch has arrested Raj Kundra in a case relating to the production of Pornography news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x