Special Recipe | झणझणीत आणि चटपटीत तवा पुलाव बनवा घराच्या घरी - नक्की वाचा
मुंबई, २० जुलै | तवा पुलाव हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे. चवीला चटपटीत आणि खूप स्वादिष्ट असा हा पुलाव घरी अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी आणि बनवा घराच्या घरी…
संपूर्ण घटक:
* 2 कप शिजलेला बासमती तांदूळ
* 1 उकडलेला बटाटा तुकडे करून
* 1/2 कप मटार
* 1/2 कप सिमला मिरची बा. चिरलेली
* 1/2 कप गाजर बा. चिरलेला
* 1 कप कांदा थोडासा जाडसर चिरून
* 3 मोठे टोमॅटो चिरून
* 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून
* 3 टेबलस्पून बटर
* 1 टीस्पून तेल
* 1 टीस्पून जिरे
* 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट
* 2 टीस्पून लाल मसाला
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1/2 टीस्पून हळद
* 1 टीस्पून धने जिरे पूड
* 2 टेबलस्पून पावभाजी मसाला
* 1 टेबलस्पून लाल मिरची लसूण चटणी
* 1/2 टीस्पून लिंबाचा रस
* चवीनुसार मीठ
* कोथिंबीर
* 1/2 कप पाणी
संपूर्ण कृती:
१. एका मोठ्या तव्यावर तेल आणि2 टेबलस्पून बटर टाकून घ्या. (तवा नसल्यास पॅन किंवा पातेले वापरा) त्यात जिरे टाकून ते ताडतडले की मिरची आणि कांदा टाकून कांदा नरम होईपर्यंत परतवा.
२. आता मटार, गाजर आणि सिमला मिरची टाकून छान शिजेपर्यंत परतवून घ्या. वाटल्यास थोडे पाणी टाकून 2-3 मिनिटे झाकण ठेऊन शिजवा. आता टोमॅटो टाकून नरम होईपर्यंत परतवा.
३. पेस्ट बाकी सर्व मसाले फक्त पावभाजी मसाला 1 टीस्पून ठेऊन मागे बाकी सर्व टाकून मिक्स करा. मीठ लिंबाचा रस आणि लाल चटणी टाकून छान तेल सुटेपर्यंत परतवून त्यात बटाटे टाकून मिक्स करा.
४. तांदूळ टाकून घ्या. वरून उरलेले बटर पावभाजी मसाला टाकून छान हलक्या हाताने परतवून घ्या. वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करा
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Tawa Pulao recipe in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल