22 November 2024 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत 'खेला' होणार | ममता कडाडल्या

CM Mamata Banerjee

कोलकाता, २१ जुलै | पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत ‘खेला’ होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.

तसेच केंद्र सरकार हेरगिरीसाठी करदात्याचा पैसा खर्च करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहीद दिन समारंभाचे तृणमूलच्या वतीने देशभरात प्रसारण करण्यात आले. देशपातळीवर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तृणमूलच्या रणनितीचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

संबोधनाच्या सुरवातील ममतांनी काळा पैसा, भष्ट्राचार,गुंडागर्दी आणि एजन्सीविरोधात लढा दिल्याबद्दल पश्चिम बंगालच्या नागरिकांचे अभिनंदन केले. बंगालवासीयांच्या आर्शिवार्दाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत टीएमसीने पुन्हा सत्ता मिळवली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच 16 ऑगस्ट हा ‘खेला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार असून गरीब मुलांना फुटबॉल वाटण्यात येतील, ही माहिती त्यांनी आपल्या संबोधनादरम्यान दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: West Bengal CM Mamta Banerjee slams Modi govt over Pegasus hacking news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x