22 November 2024 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

6 महिन्यांनंतर दिल्लीत शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पुन्हा सुरुवात | 19 दिवस चालणार शेतकरी संसद

Farmers leader Rakesh Tikait

नवी दिल्ली, 22 जुलै | कृषी कायद्यावरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. केंद्र सरकारने आणलेले हे तीन्ही कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक चर्चा झाल्या परंतु यावर काही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकारही नरमाई घ्यायला तयार नाहीये. परंतु, 26 जानेवारी रोजी दिल्लीत उसळलेल्या हिंसेनंतर केंद्र सरकारने सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या या प्रदर्शनाला अटींसह मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 22 जुलै ते 9 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 पर्यंत प्रदर्शनासाठी परवानगी असणार आहे. सभागृहात एकीकडे देशाची संसद चालणार आहे तर दुसरीकडे जंतर मंतरवर शेतकऱ्यांची सलग 19 शेतकरी संसद सुरु राहणार आहे.

राकेश टिकैत शेतकऱ्यांसह पोहोचले जंतर-मंतरवर:
भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत हे शेतकऱ्यांसमवेत दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले आहे. यापूर्वी ते सिंधू बॉर्डर असून बसव्दारे ते प्रदर्शन स्थळावर आले. प्रदर्शनात 200 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. आम्ही याव्दारे संसदेतील कार्यवाहीवर लक्ष ठेवणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. त्यामुळे जंतर मंतरवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Farmers protest Kisan Andolan Delhi Jantar Mantar Rakesh Tikait and farmers-Delhi Chalo March news updates.

हॅशटॅग्स

#RakeshTikait(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x