27 April 2025 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

परमबीर सिंह यांच्या अडचणी अजून वाढल्या | मुंबईनंतर ठाण्यातही गुन्हा दाखल

Parambir Singh

ठाणे, २३ जुलै | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्यातही त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. धमकवल्याच्या प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्यात आज गुन्हा दाखल होण्यापूर्वी गुरुवारी देखील मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपातून मुक्त करून देण्याच्या मोबदल्यात खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासहित सात जणांविरुध्द मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील एक आरोपी हा शिवसेना आमदार गीता जैन यांचा सख्खा भाऊ आहे.

मीरा भाईंदर शहरातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार त्याच्यावर असलेल्या आरोपातून मुक्त करण्याकरिता माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी १५ कोटीची मागणी केली होती. त्यानुसार मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावे आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: FIR registered against IPS Parambir Singh at Thane news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या