28 April 2025 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Special Recipe | घरच्याघरी साऊथ इंडियन स्टाइल तांदूळ-मुगाची खिचडी - वाचा रेसिपी

South Indian Khara Pongal recipe

मुंबई, २४ जुलै | दक्षिण भारतामध्ये तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून तयार करण्यात येणारी पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी म्हणजे खारा पोंगल. येथे नाश्त्यासाठी हा पदार्थ तयार केला जातो. काही ठिकाणी हा पदार्थ तांदूळ व मुगाची खिचडी म्हणूनही ओळखला. जिरे, हिंग आणि काळी मिरीच्या स्वादामुळे या पदार्थाची चव अधिक वाढते. दक्षिण भारतामध्ये विशेषतः मकरसंक्रांती सणाच्या दिवशी नाश्त्यासाठी खारा पोंगल रेसिपी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया पाककृती;

महत्त्वाची सामग्री
* 1 कप तांदूळ
* 1/2 कप मूग डाळ
* 1 कप दूध
* 1 कप किसलेले नारळ
* 4/5 चमचे तूप
* 1 चमचे जिरे
* 1 inch आले
* 4/5 आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या
* आवश्यकतेनुसार काजू
* आवश्यकतेनुसार कढीपत्ता
* 1 चमचे ब्लॅक पेपर
* आवश्यकतेनुसार हळद
* आवश्यकतेनुसार हिंग
* 5 कप पाणी
* आवश्यकतेनुसार मीठ

संपूर्ण कृती:
1: कुकरमध्ये तांदूळ-मूग डाळ शिजत ठेवा:
तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यात घ्या. कुकरमध्ये एक ग्लास पाणी ओता आणि तीन-चार शिट्या येईपर्यंत सामग्री शिजू द्या.

2: डाळ-तांदूळ शिजल्यानंतर खोबरे मिक्स करा:
कुकर थंड झाल्यानंतर डाळ आणि तांदूळ एकजीव करून घ्या. यानंतर किसलेले खोबरे त्यात मिक्स करा.

3: तुपामध्ये मिरच्या, काजू, कढीपत्ता फ्राय करा:
आता दुसऱ्या कढईत तूप गरम करा. तुपात जिरे, आले, हिरव्या मिरच्या आणि काजू फ्राय करा. यानंतर काळी मिरी, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता देखील फ्राय करावा.

4: कुकरमध्ये दूध ओता:
तयार केलेली फोडणी तांदूळ आणि डाळीच्या मिश्रणात मिक्स करा. यानंतर एक ग्लास दूध देखील कुकरमध्ये ओता. गॅसच्या मध्यम आचेवर सर्व सामग्री शिजवून घ्या. हवे असल्यास आपण आणखी पाणी मिक्स करू शकता. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ भातामध्ये घालावे.

5: तांदूळ व मुगाची पौष्टिक खिचडी:
तांदूळ व मुगाच्या डाळीची पौष्टिक खिचडी तयार आहे. वरून थोडेसे तूप सोडा म्हणजे रेसिपी अधिक चविष्ट होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: South Indian Khara Pongal recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या