25 November 2024 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस संदर्भातील वृत्त | ACB'कडून वृत्ताचं खंडन

Parambir Singh

मुंबई, २७ जुलै | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याबाबतच्या बातम्या माध्यमातून प्रसारित झाल्या आहेत. मात्र अशाप्रकारच्या बातम्यात तथ्य नसून परमबीर सिंह यांच्या विरोधात कोणतीही लूक ऑऊट नोटीस काढली नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांच्याबाबत आलेल्या बातम्या या हवेतील वावड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात अकोला, नाशिक, कोपरी आदी ठिकाणी खंडणी, धमकावणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

काय आहे लूक ऑऊट प्रकरण:
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसारित केल्या आहेत. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास सुरू आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही परमबीर सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याबाबत बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र या वृत्ताचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खंडन केले आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंह यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Lookout notice against Parambir Singh but ACB deny the news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x