22 November 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON
x

Special Recipe | झणझणीत अंडा बिर्याणी घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी

Egg Biryani Recipe in Marathi

मुंबई, २७ जुलै | अंडा बिर्याणी ही स्वादिष्ट आणी लाजवाब अशी डिश आहे.खरे तर बिर्याणी ही हैदराबादी डिश आहे पण आता पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली आहे.अंडा बिर्याणी बनविण्यास खूपच सोप्पी आहे जे नॉनव्हेज खातात ते तर ही बिर्याणी खूप आवडीने खातील. मी सांगितलेल्या पद्धतीने झटपट होणारी बिर्याणी करून पहा.

भात बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
2 कप बासमती तांदूळ (तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ चालेल)
1 मोठी विलायची
1 तुकडा दालचिनीचा
4-5 मिरे
3-5 लंवग
1 स्टारफुल
2 टेबलस्पून तूप/तेल
मीठ चवीनुसार
तांदूळ्याच्या दुप्पट पाणी
अडे मॅरीनेशन करण्यासाठी लागणारे साहित्य..
5-6 उकडून घेतलेले अंडे
1 टेबलस्पून तिखट
1/2 गरम मसाला
1 धने पावडर
1/2 टीस्पून हळद
1 टेबलस्पून मीठ

बिर्याणी लेयरिंग साठी लागणारे साहित्य:
1/4 कप चिरलेली कोथिंबीर
1/4 कप पुदिन्याची पाने
1/4 कप काजू तळलेले
2-3 टेबलस्पून तुप
तळलेला कांदा (गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेला)
8-9 केशरकाडया दुधात भिजवलेल्या

अंडयाची ग्रेव्ही करण्यासाठी लागणारे साहित्य:
मॅरीनेशन केलेले अंडे
1 मोठा कांदा बारीक चिरलेला
2 टोमॅटो बारीक चिरलेला
थोडासा तळलेला कांदा
7-8 हिरव्या मिरच्या
2 टेबलस्पून आले लसुण पेस्ट
2 टेबलस्पून तिखट
1 टेबलस्पून धनेपावडर
1/2 टेबलस्पून जिरा पावडर
1 टीस्पून हळद
1 टेबलस्पून गरम मसाला
1 टेबलस्पून बिर्याणी मसाला
1/2 कप पाणी
मीठ चवीनुसार
1/4 कप तेल
1/2 कप दही

संपूर्ण कृती:
१. तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. व चाळणीत काढून ठेवावे. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी घालावे. त्यात वर दिलेले खडे मसाले घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालावा व भात 70% शिजवून घ्यावा. अर्धवट शिजवलेला भात चाळणीत ओतून घ्यावा व त्यावरती थंड पाणी घालावे.

२. अंडी उकडून घ्यावी व त्याची टरफल काढून त्याला किंचीत क्रॉस मध्ये कट मारून घ्यावा. व या अंड्याला तिखट, मीठ, हळद, गरम मसाला लावून त्यात चांगली घोळून घ्यावी व 15 ते 20 मिनिटे तशीच ठेवून मॅरिनेट करून घ्यावी.

३. चार ते पाच कांदे उभे चिरून घ्यावे. पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात, चिरलेले कांदे घालावे. किंचित मीठ घालून हे कांदे गोल्डन कलर येईस्तोवर तळून घ्यावे. याच तेलामध्ये काजू देखील तळून घ्यावे.

४. अंड्याची ग्रेव्ही करण्यासाठी पॅनमध्ये तेल घालावे. तेल चांगले गरम झाले की, त्यात मॅरीनेट केलेले अंडे घालावे व किंचित तळून घ्यावे. (अंडे जास्त तळू नये. नाहीतर अंड्याचे वरचे कव्हर कडक होईल) आता याच तेलामध्ये कांदा घालावा. एक मिनिट परतल्या नंतर त्यात आले लसूण पेस्ट घालावी. टोमॅटो, हिरव्या मिरच्या घालाव्यात. तिखट, मीठ, धने पावडर, जीरे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला घालावा. मसाला चांगला परतून घ्यावा व तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनिटे होऊ द्यावा.

५. यानंतर यामध्ये दही घालावे. दही चांगले मिक्स करून, त्यात 1/2 कप पाणी घालावे. तीन ते चार मिनिटे होऊ द्यावे.(ही ग्रेव्ही दाटसरच ठेवावी. जास्त पातळ करू नये.) आता यामध्ये तळलेले अंडे घालावे. दोन ते चार मिनिटे झाकण ठेवून होऊ द्यावे.

६. यातलाच अर्धा मसाला काढून घ्यावा. व पॅनमध्ये शिल्लक ठेवलेल्या मसाल्यावरती शिजवलेल्या भारताची एक लेयर लावावी. त्यावरती तळलेला कांदा, पुदिना, केशरयुक्त दूध, तेल, तूप घालावे. कोथिंबीर घालावी. परत या वरती काढून ठेवलेला मसाला घालावा. त्यावरती परत भाताची लेयर लावावी व वरील प्रोसिजर रिपीट करावी. झाकण लावून 10 मिनिटे बिर्याणी होऊ द्यावी.

७. तयार आहे आपली अंडा बिर्याणी….ही गरमागरम बिर्याणी थंड थंड ताका सोबत सर्व्ह करावे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Egg Biryani Recipe in Marathi.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x