22 November 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

ममतादीदी-पंतप्रधान भेट | लोकसंख्येप्रमाणे कोरोना लस आणि पेगासस प्रकरणी सर्वपक्षीय बैठकीची मागणी

CM Mamata Banerjee

नवी दिल्ली, २७ जुलै | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली आहे. दरम्यान, ममता यांनी देशातील कोरोनाची स्थितीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. बंगाल राज्याला मिळणारी लसीची मात्रा वाढवण्यास सांगितले असून बंगालला लोकसंख्येनुसार लस मिळावी अशी मागणीदेखील ममता यांनी पंतप्रधानांना यावेळी केली आहे. त्यासोबतच राज्याचे नाव बदलण्यावरदेखील चर्चा झाली असल्याचे ममता यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या 5 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्या म्हणाल्या की, ‘मी दोन वर्षानंतर दिल्लीला आले आहे. निवडणुकांनंतर भेट घ्यावीच लागते, त्यामुळे मी आज पंतप्रधानांना भेटायला गेले. घटनेनुसार हा प्रोटोकॉल असून मी त्याचे पालन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं त्या यावेळी म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: West Bengal CM Mamata Banerjee meet PM Narendra Modi at Delhi over Covid vaccine issue news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x