24 November 2024 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Special Recipe | चमचमीत मंचुरियन रेसिपी घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी

Manchurian recipe in Marathi

मुंबई, २७ जुलै | चायनीज म्हंटल कि चमचमीत आणि चटपटीत पदार्थ आठवतात आणि मग तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे चायनीज मध्ये प्रसिद्ध रेसिपी म्हणजे व्हेज मंचुरियन. हा चटपटीत पदार्थ आपल्याकडे जास्त आवडीने खाल्ला जातो पण तो बाहेर कसा बनवतात त्यात किती कुत्रिम रंग असतो, ते कोणत्या तेलात बनवतात आपल्याला काहीच माहिती नसते. त्यामुळे आपण आज कोबी मंचुरियन बनवायची चायनीज सेंटर सारखी सर्वात सोप्या पद्धतीची व्हेज मंचूरियन रेसिपी बगणार आहोत.

संपूर्ण साहित्य:
३ वाटी पत्ता कोबी बारीक चिरून
1 सिमला मिरची लहान वाटी
1 वाटी गाजर बारीक चिरून
२ चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी
2 चमचा आले बारीक चिरून घ्या
2 चमचा कांदा पात
1 वाटी कॉर्नफ्लोर
1 वाटी मैदा
चवीनुसार मीठ
2 चमचा ब्लॅक पेपर पावडर

ग्रेव्हीचे साहित्य:
७ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
४ ते ५ मध्यम हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ चमचा सोया सॉस
१ चमचा टोमॅटो सॉस
चवीनुसार चिली सॉस
1 चमचा व्हिनेगर
१/२ वाटी पाणी
अर्धा इंच किसलेलं आलं
१ वाटी पाण्यामध्ये १/२ चमचा कॉर्नफ्लोअर एकत्र करून
१ चमचा तेल
१ चिमूटभर साखर
मीठ
कोथिंबिर

संपूर्ण कृती:
* व्हेज मंचुरियन रेसिपी Manchurian बनवण्यासाठी प्रथम कोबी, कांदापात,गाजर आणि सिमला मिरची सर्व बारीक बारीक चिरून घ्या.
* नंतर एका बाऊलमध्ये ह्या सर्व चिरलेल्या भाज्या मैदा, कार्न फ्लावर, लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर ,आल लसूण पेस्ट, मीठ आणि खाण्याचा रंग घालून मिक्स करून घेतले.
* आता ह्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करून करावे. मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना खूप लवकर पाणी सुटते, त्यामुळे गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये.
* सर्व गोळे तयार करून झाले कि कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करून मंचुरियन गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे. मंचुरियन गोळे पूर्ण तळून झाले कि ग्रेव्ही बनवूया.

ग्रेव्हीची कृती:
* ग्रेव्ही बनवण्यासाठी एका कढईत किंवा पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालावे.(तुम्हाला आवडत असेल तर उभी उभी कापलेली शिमला मिरची पण घालू शकता) आता हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.
* आता ह्या सर्व मिश्रणात कॉर्नफ्लोअर घालावे. त्यानंतर ग्रेव्हीचे मिश्रण उकळू लागले कि त्यामध्ये साखर, मीठ आणि कोथिंबिर घालावी.
मग मिश्रणाला उकळी फुटली की मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्यावे.
* आता तयार केलेले मांचुरियन गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे. ( सर्व्ह करण्याच्या थोडा वेळ अगोदर गोळे घालावेत.) एका डिश मध्ये तयार गरम बॉल्स घेऊन त्यावर गरम ग्रेव्ही घालावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Veg Manchurian recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x