21 November 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पेगॅसस हेरगिरी प्रकरण | मोदी सरकारची कोंडी | संसदेच्या आयटी समितीची आज बैठक

Pegasus hacking

नवी दिल्ली, २८ जुलै | देशात आणि जगभर गाजत असलेल्या पेगॅसस प्रोजेक्ट प्रकरणावरून काँग्रेस समविचारी पक्ष सरकारची संसदेच्या दोन्ही सभागृहात कोंडी करण्याची चिन्हं आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मोबाईलच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचं प्रकरण समोर आल्यानं भारतातील राजकीय वातावरण घुसमळून निघालं आहे.

विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यासाठी विरोधकांकडून रणनीती ठरवली जात आहे. यासंदर्भात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेसुद्धा या बैठकीला हजर असणार आहेत. दरम्यान, पेगॅसस प्रकरणावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आहे.

स्पायवेअर खरेदीचा अधिकार कोणत्या मंत्रालयास दिला? हेरगिरी कोणत्या कारणांमुळे झाली? सरकारने सुरक्षा कारणांमुळे परदेशी कंंपन्यांकडून हेरगिरी सॉफ्टवेअरची खरेदी केली. उत्तर होकारार्थी असल्यास कोणकोणत्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे?

कोठून खरेदी करण्यात आले?
* सरकारने इस्रायली कंपनीकडून पेगासस सॉफ्टवेअर खरेदी केले का?
* पेगासस खरेदीची प्रक्रिया ग्लोबल टेंडरद्वारे करण्यात आली. तसे असल्यास त्यात कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश होता?
* पेगासस सॉफ्टवेअर कोणत्या मंत्रालयाने खरेदी केले?
* स्पायवेअरचा वापर करण्यासाठी कोणते मंत्रालय अधिकृत करण्यात आले आहे?
* विरोधी नेते, मंत्री, पत्रकार व इतर व्यक्तींच्या विरोधात पेगाससचा वापर सरकारच्या पातळीवर झाल्यास कोणत्या कारणांनी हे पाऊल उचलले?

विरोधकांकडून नाकेबंदी:
* काँग्रेसची टीम : अध्यक्ष शशी थरूर, कार्ती चिदंबरम, शक्तीसिंह गोहिल, सय्यद नासिर हुसेन.
* घेरण्यासाठी साथ : जयदेव गल्ला (टीडीपी), धैर्यशील माने (शिवसेना), महुआ मोइत्रा (तृणमूल), नदीमुल हक (तृणमूल), पीआर नटराजन (माकप).
* तटस्थ : भाजपला मूक पाठिंबा : सुमनलता अंबरीश (अपक्ष), नरेंद्र जाधव, सुरेश गोपी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Parliament Monsoon Session Pegasus Snooping row meeting of all opposition parties at parliament news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x