27 April 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK
x

शिवसेना आ. प्रताप सरनाईकांचा उपक्रम | रिकामा सिलेंडर आणा मोफत ऑक्सिजन भरा

MLA Pratap Sarnaik

ठाणे, २८ जुलै | आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी स्वखर्चातुन ‘ऑक्सिजन प्लांट’ उभारला आहे . पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काल पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सिजन प्लांट’मधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे प्रात्यक्षिक झाले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लांटची पाहणी केली.

हा ऑक्सिजन प्लांट पुढील 3 ते 4 दिवसात लोकार्पण झाल्यानंतर दररोज 120 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती त्यातून होणार आहे. मीरा भाईंदरमधील नागरिकांना हे ‘ऑक्सिजन सिलेंडर’ शिवसेनेतर्फे मोफत दिले जाणार आहेत, असे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा भव्य प्लांट उभारला गेला आहे. मीरा भाईंदर येथे मीरा रोड , मंगल नगर , हटकेश येथे प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.

27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी ऑक्सिजन प्लांटचे प्रात्यक्षिक झाले. हा ऑक्सिजन प्लांट कसा चालेल , कसे हवेतून ऑक्सिजन निर्माण करून ते सिलेंडरमध्ये भरले जाईल याचे प्रात्यक्षिक आज दाखविण्यात आले. आमदार सरनाईक यांनी हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यामागील संकल्पना प्लांटची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MLA Pratap Sarnaik setup oxygen plant at Thane news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या