22 November 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

मुलींच्या संसारात आई-वडिलांचा अति हस्तक्षेप ठरतोय धोकादायक? | अनेक संसारातील समस्या - नक्की वाचा

Social

मुंबई, २८ जुलै | संसारात त्रयस्थ व्यक्तीचा “हस्तक्षेप” म्हटलं की तो अयोग्यच, आई मुलीची असो वा मुलाची. आजकाल लग्न, नवीन संसार म्हटलं की तडजोडी जशा मुली करतात तशाच मुलंही करतात.. पण मुलांच्या तडजोडी कायम झाकोळून जातात.

नवीन लग्न झाल्यावर नवीन घर, नवीन माणसं, नवीन चालीरीती याची सवय नवऱ्या मुलीला होइपर्यंत मन मोकळं करायला म्हणून स्वतःच्या आईशी बोलणं अगदीच स्वाभाविक आहे. नंतरही समजा सासरी काही गोष्टी मनासारख्या होत नसतील, किंवा पटत नसतील तर माहेरहून किंवा आईकडून योग्य मार्गदर्शन घेणंही ठीकच आहे.. यात आक्षेपार्ह काहीच नाही.. संसार सुरळीत चालला पाहिजे हे महत्त्वाचं, पण माहेराहून जर छोट्या छोट्या प्रश्नांवर चुकीचे सल्ले मिळू लागले तर अवघड होऊन जातं सगळंच. नवरा-बायकोचं नातं तलम कपड्यासारखं असतं, उसवत नाही कधी पण ताणलं गेलं तर फाटतं जरुर.. आणि एकदा फाटलं की पहिल्यासारखं होत नाही.. म्हणून इथे जपून असावं.. उगीच आक्रमकपणा नसावा.

समाजाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरु आहे हाच प्रश्न हल्ली सतावतो आहे .एवढा अमुलाग्र बदल झाला की , स्विकारताना दमछाक होत आहे .कालानुरुप असे बदल व्हायलाच पाहिजेत .प्रगत समाजाचे ते लक्षण आहे .मात्र या बदलातून कल्याणकारी फायदे अपेक्षित आहे .त्या बदलांचा पार बोजवारा उडालेला दिसतो . सारे संंदर्भच बदलले .ग्रामीण जीवन काय आणि शहरी जीवन काय . परिस्थिती सर्वदूर सारखी आहे . कायद्याने महिलांना मिळालेले सरंक्षण , कायद्याच्या दुरोपयोगात परिवर्तीत झालेले दिसते .आणि झाला श्रीगणेशा कौटुंबिक कलहाचा !

आता या कौटुंबिक कलहाची झळ बसायला नाही म्हणायला चांगली सुरुवात झाली आहे . एरवी जे कुटुंब संभ्रांत किंवा सुसंस्कारीत वाटायची तिथल्या कुटुंब संस्थेला सूद्धा शेवटची घरघर लागते की काय असे चित्र निर्माण झाले . मुंबई – पुण्यात अशी परिस्थिती आहे की , बहुधा मम्मी – डॕडीचे वास्तव्य मुलीकडे आहे . घरमालक असलेल्या नवऱ्याचे आईवडील केव्हाच हद्दपार झाले .वेळ आली तर वृद्धा श्रमात रवानगी . दुसरा जवळचा पर्याय नाही .जन्मदातेच अडगळ वाटावेत आशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे .

ही अशी परिस्थिती काही एक – दोन दिवसात निर्माण झाली नाही. सुरुवातीला पद्धतशिर डोळेझाक केली , त्याचे दृष्य परिणाम आता दिसायला लागले एवढेच . जो नवरा , बायकोच्या ताटाखालचे मांजर होऊन राहात आहे त्याचा संसार वरदर्शनी टिकून आहे . मुलीच्या संसारात तिच्या आई – वडीलांचा हस्तक्षेप कमालीचा वाढला आहे . मुलीच्या मुठीत जावई असावा आणि सूनेने मात्र मुलाचे अंकीत रहावे अशी संस्कृती बळावतांना दिसत आहे .

अशी संस्कृती मूळ धरत असताना किंवा रुजताना जाणवली की काही बाबींचे स्मरण आपसूक होते . ‘ दिली गाय अन् तिची आशा काय ‘ ! ही जी मानसिकता होती मुळात तीच लोप पावली .मुलीचे लग्न होताबारोबर संपूर्ण घराची ती मालकीण व्हावी आणि तिच्या आदेशाबर हूकूम कुटुंबाचे सारे व्यवहार बिनभोबाट चालावेत अशी मनिषा पालकांची बनली आहे . समाजातील संतुलन बिघडण्याचे आणि संसारातील दुःख वाढण्याचे मूळ कारण मुलीचे आईवडील आहेत. हे प्रथमदर्शनी निदान आहे . मुलीचा संसार सुरळीत कसा राहील यापेक्षा बिब्बा घालण्यात त्यांना आसुरी आनंद होतो . फक्त एकटा जावई आणि तोही नंदीबैल त्यांना पाहिजे असतो.

मुलीच्या संसारात सर्व सुरळीत असताना तिचे आई वडील हस्तक्षेप करत असतील तर काय उपाय करावा?
१. एक पाऊल मागे घेतले तर बरेच problem सुटतात..ह्या प्रमाणे मुलगी/सुन विश्वासात घेवून तिच्या समस्या काय आहेत ह्याचा विचार सर्वात प्रथम करणे,कारण तीला असणाऱ्या समस्याना तीच्या नवऱ्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ती तीच्या आई वडिलाना सांगत असते आणि त्यामुळेच आई वडिल हस्तक्षेप करतात.
२. घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवणे-सर्व सणासुदीच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे.लग्नसराईत – नातेवाईंकाच्यात सुनेला मानाने पाठवणे.बाहेर कधीकधी सिनेमा-जेवायला-फिरायला पाठवणे.
३. समाज्यातील लावालावी करणाऱ्या व्यक्तिपासून सावध रहाणे व ज्यात्या वेळीच गैरसमज दुर करणे.
४. रोज संध्याकाळी/रात्री एकत्र जेवताना मुक्त संवाद करणे.रोजचे दैनंदिन अनुभव शेअर करणे.
५. नविन खरेदी-विक्री-समारंभ बद्दल एकत्रित चर्चा करणे.
६. बरेच उपाय आहेत..पण प्रत्येकाचा स्वभाव महत्वाचा आहे. समस्या सर्वत्र आहेत..कोण कोणाच्या आयुष्यात किती लक्ष दयावे,प्रत्येक वेळी सल्ला द्यायलाच पाहिजे असं नसत..स्वतःलाच निर्णय घ्यावे लागत असतात..

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Family Social issues which impact family news updates.

हॅशटॅग्स

#Social(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x