आज निवडणूक झाल्यास एनडीएला तब्बल १०८ जागांचं नुकसान होईल : सर्वे
नवी दिल्ली : आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार नाही. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’ नावाने एक सर्व्हे केला आहे. साडे चार वर्षांनंतर युपीए आघाडीला दुपटीने जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला ५५ जागांचं नुकसान होताना दिसत आहे.
दुसऱ्या राजकीय परिस्थितीनुसार, जर काँग्रेसप्रणीत युपीएने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेसला सोबत घेतलं तर एनडीएची मतदान टक्केवारी कमी होणार नाही मात्र जागा कमी होऊन २२८ होऊ शकतात. याचा अर्थ एनडीएला एकूण १०८ जागांचं नुकसान होऊ शकतं. तर युपीएच्या जागा वाढून २२४ होऊ शकतात. सोबतच मतदान टक्केवारी वाढून ४१ टक्के होऊ शकते, म्हणजे युपीएला १६४ जागांचा फायदा होऊ शकतो. इतरांच्या खात्यात ९२ जागा आणि २३ टक्के मतं जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे एनडीए आणि युपीएमध्ये फक्त चार जागांचं अंतर राहत आहे. त्यामुळे लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते.
तिसरी राजकीय परिस्थिती दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांच्या युतीवर आधारित आहे. सर्व्हेत सांगितल्यानुसार, जर एनडीएने तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमूक आणि आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसला सोबत घेतलं आणि काँग्रेसने टीडीपी आणि जम्मू काश्मीरमधील पीडीपीला सोबत घेतलं तर एनडीएचा जागांचा आकडा २५५ पर्यंत पोहोचू शकतो. तसंच मतदान टक्केवारी ४१ टक्के होऊ शकते. अशा परिस्थितीत युपीएला २४२ जागा आणि ४३ टक्के मतं मिळू शकतात. इतरांना ४६ जागा आणि १६ टक्के मतं मिळू शकतात. अशा परिस्थितीतही लोकसभेत त्रिशंकू होईल.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार