22 November 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजपमध्ये भूकंप होणार? | खडसेंप्रमाणे गेम होतोय, पंकजांनी शिवसेनेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव - सविस्तर वृत्त

Pankaja Munde

मुंबई, २९ जुलै | फडणवीस राज्याचे मुंख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी स्वपक्षातील दिग्गज नेते आणि एखाद्या समाजाचा चेहरा असणाऱ्या नेत्यांना शिस्तबद्ध संपवण्याचा घाट घातला आणि तो प्रत्यक्षात देखील उतरवला आहे. पक्षांतर्गत सर्व ज्येष्ठ नेत्यांचं राजकीय महत्व संपूष्टात आणून आयात नेत्यांना पुढे करण्याचा सपाटा लावल्याची भावना राज्य भाजपात निर्माण झाली आहे.

भविष्यात आपल्याला स्पर्धक ठरतील अशा नेत्यांना नियोजनबद्ध बाजूला करून स्वतःचा गट निर्माण करायचा आणि संपूर्ण राज्य भाजप स्वतःच्या मुठीत ठेवायची योजना अमलात आणली गेल्याचं राजकीय विश्लेषक देखील सांगत आहेत. त्यात ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत पर्याय उभे केले जातं असून तसंच नियोजन सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पंकजांनी निर्णय घेण्यास उशीर केल्यास त्यांना अनेक राजकीय धोके उद्भवू शकतात आणि मुंडे कुंटुंबीयांचं ओबीसी समाजामधील महत्व कमी करून त्यांचं राजकीय वजन घटवलं जाऊ शकत असेच संकेत मिळत

बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक विशेषत: वंजारी समाज संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही नाराज असून पंकजा यांनी पक्षत्याग करावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवत आहेत. परंतु, या दबावाला बळी न पडता भारतीय जनता पक्षातच चित्र बदलाची वाट पाहण्याचा पुनरुच्चार पंकजा यांनी केल्यामुळे या संघटनांचे पदाधिकारी त्यांच्यावरही नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जागृत झालेला वंजारी समाज मुंडे कुटुंबावर निस्सीम प्रेम करतो. संपूर्ण महाराष्ट्रात हा समाज विखुरलेला असून मराठवाड्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही ही संख्या लक्षणीय आहे. त्यातील बहुतांश पंकजा यांचेच समर्थक आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा यांचे नेतृत्व उदयाला येऊ नये म्हणून त्यांना एकनाथ खडसे यांच्यासारखी वागणूक देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्याच काही नेत्यांकडून ठरवून त्यांना पराभूत करण्यात आले, असे या भागातील समाजबांधवांचे मत आहे.

पंकजा यांनाही खडसे यांच्यासारखेच राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी तुलना प्रकर्षाने उत्तर महाराष्ट्रात केली जाते आहे. खडसे यांनी ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा त्याग करून नवा मार्ग पत्करला तसाच पंकजा यांनीही पत्करावा असे या पदाधिकाऱ्यांना प्रकर्षाने वाटते आहे. त्यांनी पक्षांतराविषयी पंकजांकडे विषय काढला तेव्हा त्यांनी नकार दिल्यामुळे हे कार्यकर्ते व पदाधिकारी काहीसे नाराज झाले आहेत.

शिवसेनेत प्रवेशासाठी आग्रह:
एकनाथ खडसे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले असले तरी पंकजा यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. एक तर उद्धव ठाकरे हे पंकजा यांना बहीण मानतात. त्यांनी डाॅ. प्रीतम यांच्या विरोधात उमेदवारही दिला नाही. शिवसेना पंकजा यांना मंत्रिपद देईल, असा विश्वासही त्यांना वाटतो. काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी समाज माध्यमांवर मोहीमही सुरू केली. समाजाचा दबाव वाढला तर पंकजा पक्षत्याग करतील, अशी आशा पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Pankaja Munde should join Shivsena due to internal politics against her news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x