23 November 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

मनसे पारनेर तालुकाध्यक्षाच्या पत्नीला खंडणी प्रकरणी अटक

Raj Thackeray

अहमदनगर, २९ जुलै | एकाबाजूला पक्षातील वरिष्ठ आगामी महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुकीत व्यस्त आहेत तर दुसऱ्या बाजूला इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मनसेच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आली आहे, पारनेर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि पारनेर तालुक्यातील रोहिदास भास्कर देशमुख यांच्या मालकीची १९ एकर जमीन आहे.

२०१८ मध्ये तेथे डाळींबाचा बाग होता. १ नोव्हेंबर २०१८ रोजी तेथील स्थानिक रहिवासी दगडू दुर्योधन केदारी, त्याचा मुलगा तसंच जामगांव येथील बाळासाहेब पोपट माळी यांनी जमिनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. या क्षेत्रामध्ये टाकण्यात आलेली टपरी का टाकली अशी विचारणा केली असता बाळासाहेब माळी याने दगडू दुर्योधन केदारी यांच्याकडून मी जनरल मुख्यत्यारपत्र करून घेतले आहे. प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाचा निकाल देशमुख यांच्याविरोधात गेला आहे.

त्यामुळे देशमुख यांना या क्षेत्रात वहिवाट करण्याचा किंवा शेती करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर २२ नोहेंबर रोजी देशमुख यांनी माळी तसेच केदारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एकरी पाच लाख रूपयांप्रमाणे खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास परिणाम वाईट होतील, तुम्हाला शेतामध्ये येऊ देणार नाही. जर शेतामध्ये आले तर तुमचे हातपाय मोडून टाकू असा दमही दिला होता.या गुन्ह्यात अरोपींमध्ये पुष्पा माळी यांचाही समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा माळी पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. त्यामुळे त्यांना आतापर्यंत अटक झाली नव्हती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ahmednagar MNS leader’s wife arrested in ransom case news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x