23 November 2024 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Special Recipe | झणझणीत मेक्सीकन राईस बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Mexican Rice recipe in Marathi

मुंबई, २९ जुलै | भारतीय खाद्य संस्कृतीतील अनेक पदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे विदेशातील देखील अनेक रेसिपी भारतातही प्रसिद्ध असून त्या मोठ्या प्रमाणात हॉटेल मध्ये अनुभवायला मिळतात. त्यातील एक म्हणजे मेक्सीकन राईस. चला तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत मेक्सीकन राईस घरच्याघरी कसा बनवायचा ते. तर चला आज पाहूया झणझणीत मेक्सीकन राईस रेसिपी;

संपूर्ण साहित्य:
* 50 ग्रॅम बासमती राईस
* 1 गाजर चिरुन
* 1 शिमला मिरची चिरुन
* 1 कांदा चिरुन
* 1 टोमॅटो चिरुन
* 1 कप कोबी चिरुन
* 1 कप मटर
* 2 चमचे आले पेस्ट
* 1/2 टीस्पून मिरे पुड जाडसर
* 2 हिरव्या मिरच्या
* 3 चमचे बटर
* 7 पुदिना पाने
* मीठ

संपूर्ण कृती:
१. प्रथम तांदुळ धुवुन पाणी निथळुन दहा मिनिटे ठेवा. तोपर्यंत सर्व भाज्या चिरुन घ्या.
२. आता पॅन मधे बटर गरम करून त्यात तांदुळ गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतुन घ्या.
३. परतुन झाल्यावर त्यात सगळ्या भाज्या,मटर,आले पेस्ट घालुन पुन्हा पाच,सात मिनिट परता.
४. आता यात मिरे पुड,चविनुसार मीठ घाला,आणि जेवढे तांदुळ तेवढेच पाणी घाला,आणि पॅन वर झाकण ठेउन राईस शिजु द्या.
५. आता दहा मिनिटानी राईस शिजत आल्यावर अर्धा चमचा सोया सॉस घाला.
६. आता मस्त वरुन पुदिना घालुन गरम गरम मेक्सीकन राईस सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Mexican Rice recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x