22 November 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये? | वर्ध्यात पंतप्रधानांची ऑडिओ क्लिप वाजवत काँग्रेसची सायकल यात्रा

petrol diesel price

वर्धा, ३१ जुलै | ‘पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये’ या पंतप्रधानाच्या जुन्या भाषणाच्या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. हीच क्लिप कारंजा तालुक्यात युवक काँग्रेसच्यावतीने इंधन आणि महागाईच्या विरोधात सायकल यात्रा काढली होती. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात कारंजा ते आर्वी अशी 45 किलोमीटरची ही सायकल यात्रा शुक्रवारी काढण्यात आली.

मागील काही दिवसात पेट्रोलच्या डिझेल गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबत अन्नधान्य, खाद्यतेल यांच्याही किमतीत वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. हा असंतोष दिल्लीतील सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. शेतकरी विरोधी कायदे, सामान्य नागरिकांच्या विरोधात असलेले हे धोरण असो की बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नावाने झालेली फसवणूक या सगळ्याचा निषेध करण्याचे काम राज्य आणि देशभरात युवक कॉंग्रेस करत आहे, असे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी सांगितले.

यावेळी या सायकल यात्रेत मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सहभागी झाले होते. युवकाचा आक्रोश या आंदोलनातून दिसून आला. शेकडोच्या संख्येने युवकानी सायकल घेत या यात्रेत सहभाग घेतला. यावेळी मोदी सरकाराच्या आश्वासनांचे ऑडिओ क्लिप वाजवत जुने आश्वासन लोकांना आठवण करुन देताना लोकांचा केलेला भ्रमनिरास मांडण्याचे काम सायकल यात्रेतून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress cycle rally at Wardha with playing PM Narendra Modi audio clip news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x