24 November 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

ते सध्या काय करत आहेत? | म्हणाले, पक्षाने माझ्याकडे हरियाणाची जबाबदारी दिली आहे - विनोद तावडे

Vinod Tawde

कल्याण, ३१ जुलै | मागील २ वर्षांपासून राज्याच्या राजकारणातून जवळजवळ दूर गेलेले भाजपचे माजी मंत्री आणि नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी कल्याण पूर्वेत भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्यांनी भाजप आणि मनसे युती याबाबत वक्तव्य केलं आहे.

भाजपा-मनसे युती संदर्भात उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही, असं विधान माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कल्याणमध्ये केले आहे. राज्याच्या मुख्य राजकारणातून अलिप्त असलेले विनोद तावडे हे शुक्रवारी कल्याण पूर्वेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘माझ्याकडे पक्षाने हरियाणाची जबाबदारी दिली असल्याने मी सध्या तिकडची जबाबदारी सांभाळत आहे.’ असं विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना विनोद तावडे यांचे न दिसणे हा चर्चेचा विषय झाला होता. अखेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या याबाबतच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं आहे.

दुसरीकडे याचवेळी त्यांना मनसे आणि भाजपच्या युतीवर देखील विचारण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले की, ‘भाजपा-मनसे युती संदर्भात उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही. दरम्यान, त्यांच्या या विधानमुळे आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राज्यातील सत्ता गमावली. याचवेळी त्यांनी शिवसेनेसारखा आपला जुना मित्र देखील गमावला.

अशावेळी राज्यात जर पुन्हा सत्तेच्या दिशेने पावलं टाकायची असल्यास नव्या मित्राचा शोध घेणं हे भाजपसाठी अपरिहार्य आहे. अशावेळी शिवसेनेला टक्कर देणारा एकमेव पक्ष मनसे असल्याचं भाजपला वाटतं त्यामुळेच मनसेसोबत युती करण्याबाबत भाजप विचार करु शकतं असं त्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Vinod Tawde present to BJP program after two years news updates.

हॅशटॅग्स

#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x