22 November 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

वाहनांच्या आड कपल्सचे अश्लील चाळे | कॉलनीला लावावे लागले 'नो किसिंग झोन'चे फलक

No Kissing Zone board

मुंबई, ०२ ऑगस्ट | मुंबईतील एका सोसायटीमध्ये पेन्ट करण्यात आलेले फलक सध्या चर्चेत आहे. या ठिकाणी एका सोसायटीतील लोकांनी आपल्या पार्किंगच्या जागी ‘NO KISSING ZONE’ (नो किसिंग झोन) असे ठळक अक्षरांमध्ये पेन्ट केले आहे. स्थानिकांच्या मते, या ठिकाणी येणाऱ्या रोजच्या प्रेमी युगुलांमुळे ते कंटाळले होते. लॉकडाउनच्या काळापासूनच या ठिकाणी कपल्स येण्यास सुरुवात झाली होती. त्यांना थांबवण्यासाठी सोसायटीने हा प्रयत्न केला आहे.

सोसायटीतील नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे, लॉकडाउनच्या काळात या सोसायटीच्या पार्किंगच्या जागेवर कपल येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी लावलेल्या वाहनांच्या आड कपल्स अश्लील चाळे करतात. गेल्या काही दिवसांपासून हा जनु हा कपल्सचा स्पॉट बनत होता. अशात जोडप्यांच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून आम्ही हा फलक लावला असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

फलक लिहिल्यापासून कमी झाले प्रमाण
मुंबईतील बोरिवली येथे असलेल्या सत्यम शिवम सुंदरम सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. सोसायटीत राहणाऱ्यांनी सांगितले, की लोक या ठिकाणी येऊन खुलेआम किस करायचे. स्थानिकांना आपल्या कुटुंबासोबत सोसायटीत ये-जा करणे कठिण झाले होते. अगदी डोळे बंद करून लोकांना आपल्या घरात प्रवेश करावा लागत होता. त्यानंतर याच ठिकाणी ‘NO KISSING ZONE’ असे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. असे लिहिल्यानंतर जोडपे येण्याचे प्रमाण खूप कमी झाले असे स्थानिकांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: No Kissing Zone board in Borivali Society news updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x