26 November 2024 2:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | सुप्रीम कोर्टात आधीच आव्हान दिल्याने चौकशीसाठी हजर राहणार नाही

Anil Deshmukh

मुंबई, ०२ ऑगस्ट | 100 कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. तसेच त्यांचा – मुलगा ऋृषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

अनिल देशमुख ईडी समोर आज सुद्धा उपस्थित राहणार नाही, त्यांच्या वतीने वकील इंदरपाल उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने अनिल देशमुख यांनी ईडीचा तपास अधिकाऱ्यांचे नावे एक पत्र जारी केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वकील इन्‍दरपाल बी सिंग हे उपस्थित राहतील असे पत्राद्वारे कळवले आहे.

या पत्रामध्ये अनिल देशमुखांनी लिहिले की, ईडीची माझ्या विरोधातील कारवाई ही कायदा आणि सत्तेचा गैरवापर म्हणून करण्यात आली. मी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच आव्हान दिले असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने 3 ऑगस्ट ही तारीख देताच ईडीने सोमवारी समन्स जारी केला असे देशमुखांनी पत्रात लिहिले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former home minister Anil Deshmukh letter to ED news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x