5 November 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

दाभोलकरांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता

मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे सनातनवरील बंदीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली ठाणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सनातन संस्थेच्या काही कार्यकर्त्यांवर दोषारोप सिद्ध होवून त्यांना न्यायालयाने आरोपींना चौदा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस पथकाने या संस्थेबद्दल महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर केला होता. सनातन संस्थेचा इतिहास, एटीएसचा अहवाल तसेच पुराव्यांचा आधारे विचार करून ११ एप्रिल २०११ रोजी तत्कालीन आघाडी सरकारने ‘सनातन’ वर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता, असे तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

सप्टेंबर २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने उच्च न्यायालयासमोर सनातन वर बंदी घालण्याची भूमिका कायम ठेवली होती. त्यामुळे हिंदुत्वादी चेहरा म्हणून ओळख असलेल विद्यमान सरकार सनातनबाबत काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x