22 November 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

जनतेची मोठी मागणी | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमचं नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव द्या

PM Narendra Modi

मुंबई, ०६ ऑगस्ट | केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम केली आहे. निरुपम यांनी म्हटलंय की, “प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची अशी मोठी मागणी आहे की, अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे. खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?, अशी विचारणा करत हा निर्णय चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे.

मोदी काय म्हणाले?
भारतभरातील नागरिकांकडून मला खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या मतांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करत, खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात येत आहे. जय हिंद! मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते ज्यांनी भारताचा सन्मान वाढविला. आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्याच्या नावावर ठेवला जाणे योग्य आहे”, असे ट्विट मोदी यांनी केले.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाने आम्ही सर्व जण प्रभावित आहोत. विशेषत: हॉकी संघातील आपल्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवली, जिंकण्याच्या प्रती ती जिद्द दाखवली ती वर्तमान आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. देशाला अभिमानास्पद बनवलेल्या क्षणांमध्ये, अनेक देशवासियांची विनंती देखील समोर आली आहे, की खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद जी यांना समर्पित केले जावे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे, असे मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress Sanjay Nirupam criticized PM Narendra Modi over Rajiv Gandhi Khel Ratan award renamed news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x